एम. जी. इंग्लिश मेडिअम स्कुल 'पणती महोत्सव' उत्साहात साजरा   - Saptahik Sandesh

एम. जी. इंग्लिश मेडिअम स्कुल ‘पणती महोत्सव’ उत्साहात साजरा  

करमाळा (दि.२१) –  दि.१८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते दुपारी १२ दरम्यान दिव्यांचा सण असलेल्या दिवाळीच्या पूर्वसंध्येचे औचित्य साधून एम .जी. इंग्लीश मेडीयम स्कुल मध्ये ‘पणती महोत्सव’ उत्साहात साजरा करण्यात आला  प्रशालेच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला.

या पणती महोत्सवाचे उद्घाटन मुख्याध्यापक बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी उपमुख्याध्यापक अनिस बागवान, पर्यवेक्षक रमेश भोसले, पर्यवेक्षिका सुनिता नवले, विज्ञान शाखा विभाग प्रमुख विजय पवार यांचे सह सर्व सहशिक्षक सह शिक्षीका , शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी -विद्यार्थीनी उपस्थित होते .नवीन शैक्षणिक धोरण (NEP) २०२० च्या कृतीयुक्त अध्ययन अध्यापनाच्या उपक्रमांतर्गत स्कुलच्या चिमूकल्या विद्यार्थी – विद्यार्थीनींच्या कल्पकतेला व कला गुणांचा विकास , व्यवहार ज्ञान कळावे , प्रत्यक्ष मार्केट चा अनुभव ,व्यावसायिक कल्पकता, संवाद कौशल्ये, मेहनतीची जाणीव आदी उद्देश समोर ठेवून या ‘पणती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या मध्ये सर्व नर्सरी, एल के जी, यु के जी व फर्स्ट स्टँडर्ड च्या चिमूकल्या विद्यार्थी विद्यार्थीनिंनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. मार्गदर्शक शिक्षिकांनी त्यांना डेमो दाखवून पणत्या बनवण्याबाबत मार्गदर्शन केले.  त्यानुसार चिमुकल्यांनी निसर्गास पूरक इको फ्रेंडली, माती, कागद इ च्या सुंदर पणत्या बनवण्याचा आनंद घेतला. बनवलेल्या पणत्या विक्रीसाठी स्टॉल ही उभारले होते. संकुलातील इतर वर्गांच्या विद्यार्थ्यांनी, शिक्षक – शिक्षीका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी व पालकांनी कुतूहलाने पणत्या विकत घेतल्या . हा महोत्सव यशस्वी होण्यासाठी सौ .कोरडे मॅडम, सौ वायकर मॅडम , सौ दिवान मॅडम , सौ वीर मॅडम व शिलाताई मेकळकी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!