शैक्षणिक सहलीसाठी देण्यात येणाऱ्या खराब बसेसमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात
केम(संजय जाधव) : शैक्षणिक सहलीसाठी देण्यात येणाऱ्या खराब बसेसमुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात येत असुन याची दखल घ्यावी अशा विनंतीचे निवेदन शिक्षक भारती संघटनेने करमाळा आगार प्रमुखांना निवेदन दिले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासन निर्णयानुसार शैक्षणिक सहलीची जबाबदारी शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांच्यावर सोपवण्यात आलेली आहे. त्यासाठी विमा, रक्तगट, पालकांचे हमीपत्र, अनेक प्रशासकीय परवानग्या व मुख्याध्यापकांचे लेखी हमीपत्र घेतले जाते. मग सुरक्षित प्रवासासाठी सुरक्षित बस सेवा पुरवण्याची जबाबदारी कोणाची? करमाळा आगारातील बस शैक्षणिक सहली पार पाडण्यासाठी सुस्थितीत नाहीत. सहली अवघड घाट असणाऱ्या मार्गावरून समुद्रकिनारी जातात. हा प्रवास करण्यासाठी नवीन व सुस्थितीतील बस असणे आवश्यक आहे. करमाळा आगारातील बस मधून सहल प्रवास हा विद्यार्थ्यांसाठी धोकादायक आहे. शासनाकडून नवीन बस मिळाल्या तरच सहलीसाठी देण्यात याव्यात अन्यथा विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळू नका नवीन सुस्थितीत बसेस उपलब्ध न करता खराब व खोळंबा करणाऱ्या बसेस सहलीसाठी दिल्यास काही दुर्दैवी घटना घडल्यास आपण जबाबदार राहाल याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे.
करमाळा येथील गिरीधरदास देवी शाळेची सहल ११७ विदयार्थासह गेली होती बसची स्टेअरिंग लाॅक झाली बसचा पाटा तुटला होता परमेश्वर कृपेने कोणतेही दुदैवी घटना घडली नाहि चांगल्या बसेस सहलीसाठी उपल्बध्द कराव्यात या बाबत करमाळा आगार प्रमुखाना आम्ही निवेदन दिले.
● विजयकुमार गुंड, शिक्षक भारती संघटना प्रवक्ता