मुलींनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहावे - तहसीलदार शिल्पा ठोकडे - Saptahik Sandesh

मुलींनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहावे – तहसीलदार शिल्पा ठोकडे

करमाळा (दि.६) : पुरुषांबरोबर स्त्रिया देखील सर्व क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत आहेत, त्यामुळे मुलींनी स्वतःच्या पायावर उभा राहून आपल्या आई-वडिलांचे स्वप्न साकार करावे. हेच खरे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन ठरेल. असे मत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी व्यक्त केले. श्रीमती गंगुबाई संभाजी शिंदे नर्सिंग महाविद्यालय, करमाळा येथे आयोजित सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी बोलताना तहसीलदार शिल्पाताई ठोकडे म्हणाल्या
सावित्रीबाई फुलेंनी समाजात स्त्रियांना मानाचे स्थान देण्याचे काम केले आहे. चूल आणि मूल या संस्कृती मधून बाहेर पडण्यास पालक तयार नाही. ही दुर्दैवाची गोष्ट आहे
शिक्षणाची कास धरून प्रत्येक मुलींनी शिक्षण घेऊन स्वतःची स्वतंत्र प्रतिमा तथा व्यक्तिमत्व तयार करावे. एक स्त्री शिकली तर तिचे संपूर्ण कुटुंब सासर व माहेर या दोन्ही घरात प्रगती होऊ शकते. यामुळे मुलींनी शिक्षण घ्यावी काळाची गरज आहे. नर्सिंग कॉलेज मधील 40 विद्यार्थिनींनी आम्ही आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करू असे आश्वासन तहसीलदार शिल्पाताई ठोकडे यांना दिले

यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्राध्यापक नितीन तळपाटे यांनी तब्बल एक तासाच्या आपल्या भाषणातून संपूर्ण जीवन प्रवास विद्यार्थ्यांपुढे मांडला. कॉलेजमधून संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मोफत शिक्षण मिळत असून त्याचा आपण फायदा घ्यावा असे आवाहन केले.

यावेळी बोलताना दिग्विजय बागल म्हणाले की, जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी नर्सिंग कॉलेज चालू करून विद्यार्थ्यांना चांगली संधी दिली आहे. रुग्णांसाठी मोफत दवाखाना सुरू करण्याचे शिवसेना कार्यकर्त्यांचे स्वप्न आम्ही सगळेजण मिळून पूर्ण करणार असल्याचे सांगितले

यावेळी प्रसिद्ध व्याख्याते प्रा. नितीन तळपाडे, शिवसेनेचे युवा नेते दिग्विजय बागल, विजयराव पवार, शिवसेना उपतालुकाप्रमुख अंकुश जाधव, डॉ. गौतम रोडे, बाळासाहेब वाघ, करमाळा शिवसेना समन्वयक निलेश राठोड, ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर, प्रा. अशोक नरसाळे, आदी पदाधिकारी उपस्थित होते. संस्थेचे चेअरमन तथा शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!