शेळकेवस्ती (दहिगाव) शाळेत सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी

करमाळा(दि.६) : करमाळा तालुक्यातील शेळकेवस्ती (दहिगाव) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्षपदी दहिगाव सोसायटीचे माजी चेअरमन अनुराधा शेळके या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून दहिगाव लोकनियुक्त सरपंच प्रियंकाताई गलांडे या उपस्थित होत्या. शेळके वस्तीवरील सर्व माता किशोरवयीन बालिका व पालक वर्ग बहुसंख्येने यावेळी उपस्थित होते. यावेळी शाळेतील विविध विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांच्या यांच्या कार्याचे महत्त्व सांगितले. या दिवशी काही मुलींनी साड्या घालत शाळेत शिक्षिकेची भूमिका बजावली.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्योतीराम पाडुळे यांच्याकडून मुलांसाठी खाऊ व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री विजय राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक दस्तगीर शेख यांनी केली यावेळी ग्रामपंचायत सदस्य संदेश शेळके महेश शेळके स्वाती शेळके राजकुमार गलांडे आदीजन उपस्थित होते.





