जीवन शैलीत बदल झाल्याने नैसर्गिक प्रसूतीऐवजी सीझरच प्रमाण वाढले - डॉ. अशोक काळे - Saptahik Sandesh

जीवन शैलीत बदल झाल्याने नैसर्गिक प्रसूतीऐवजी सीझरच प्रमाण वाढले – डॉ. अशोक काळे

करमाळा (दि.७) : जीवन शैलीत बदल झाल्याने नैसर्गिक प्रसूती होण्याऐवजी सीझरच प्रमाण वाढले असल्याचे प्रतिपादन अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे संस्थापक सदस्य डॉ. अशोक काळे यांनी करमाळा येथे केले. महिलांना सुलभ प्रसूतीसाठी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सुलभ नैसर्गिक प्रसूतीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायत व पंचायत समिती करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी दि. 3 जानेवारी रोजी ‘लज्जा गौरी मोहीम’ कार्यक्रम घेण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ.काळे उपस्थित होते. पुढे बोलताना डॉ. काळे म्हणाले की, आपल्या पूर्वजांनी नैसर्गिक प्रसूतीसाठी आडवे न झोपता उभ्याने किंवा पायाच्या चवड्यावर बसून प्रसूती करण्यासाठीचे तंत्रज्ञान आत्मसात केले होते. त्यालाच लज्जा गौरी म्हणून संबोधण्यात येते. जगातील बहुतेक विकसित देशातील महिलांच्या  डिलिव्हरीच्या काळात सिजेरियनचा दर हा 10% च्या आसपास असताना, भारतात तो 60%असल्याचा खळबळजनक खुलासा डॉ. अशोक काळे यांनी महिलांना प्रबोधन करताना केला. नैसर्गिक प्रसूती साठी आपल्या पारंपारिक प्रसूती पद्धतीची माहिती त्यांनी दिली.

पूर्वी केर काढणे, जात्यावर दळण, जिने खाली वर करणे, खाली बसून धुणे भांडे करणे, पाटा वरवंटा वाटणे, हे आता कालबाह्य झाले, त्यामुळे जीवन शैलीत बदल झाले. परिणामी सीझरच प्रमाण वाढले. हे त्यांनी आवर्जुन नमुद केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी करमाळा तहसीलच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे, प्रमुख पाहुणे पंचायत समितीचे BDO डॉक्टर अमित कदम साहेब, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश्वर काटकर उपस्थित होते. बार्शी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे सदस्य डॉ. महादेव खताळ उपस्थित होते. आरोग्य विभाग चे CHO, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, गट प्रवर्तक, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.

याबरोबरच अखिल भारतीय ग्राहक पंचायत सोलापूर महिला आघाडी प्रमुख माधुरी परदेशी, नीलिमा पुंडे, ललिता वांगडे, निशिगंधा शेंडे, मैत्री पाटील, शिला तळेकर व अखिल भारतीय ग्राहक पंचायत चे तालुका अध्यक्ष ॲड. शशिकांत नरुटे सर, संघटक चक्रधर पाटील, भीष्मचार्य चांदणे, अजीम खान, संभाजी कोळेकर, ब्रम्हदेव नलवडे, सुमित परदेशी, रमेश शिंदे आदींनी परिश्रम घेतले, नीलिमा पुंडे  यांनी सूत्रसंचालन केले तर मैत्री पाटील हिने आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!