उंदरगावच्या शाश्वत विकासासाठी सर्व ग्रामस्थांनी एकत्र यावे – विलासराव घुमरे
करमाळा(दि.१९): यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा व मौजे उंदरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार (दि. १९) उंदरगाव (ता.करमाळ) येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत कनिष्ठ विभागाचा श्रमसंस्कार सोहळा मोठ्या उत्साहात साजरा झाला.
याप्रसंगी विद्या विकास मंडळाचे सचिव माननीय विलासरावजी घुमरे यांनी राजकीय गट तट विसरून तसेच गावाच्या शाश्वत विकासासाठी ग्रामस्थांनी या शिबिराच्या माध्यमातून शाश्वत विकास करून घ्यावा असे आव्हान केले. तसेच यावेळी ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना त्यांनी ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी लक्ष्मी नांदते असे गावे इतिहास निर्माण करतील असा आत्मविश्वास मांडला.
याप्रसंगी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड सर यांनी आर्थिक श्रीमंती बरोबर मनाची श्रीमंती या गावाकडे आहे असे उदगार काढले . तसेच मा प्राचार्य डॉ.एल. बी.पाटील यांनी एन.एस.एस (NSS) च्या स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या प्रसंगी उंदरगाचे सरपंच श्री . युवराज मगर, उपसरंपच श्री.शिवाजी कोकरे व सर्व ग्रामस्त उपस्थित होते याप्रसंगी ग्रामपंचायत उंदरगाव चे ग्रामविकास अधिकारी यशवंत कुदळे, तलाठी श्री. शंभू कनेरे, सर्व ग्रामस्थ व महिला मोठया संख्येने उपस्थित होते. तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य संभाजी किर्दाक व यशवंत परिवार सर्व सदस्य उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या प्रास्तविकात राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक सोलापूर प्रा. लक्ष्मण राख यांनी केले तर सुत्रसंचलन कुमारी.तेजश्री गवळी हिने केले तर इंग्रजी मधून मनोगत ईशा दाभाडे हिने केले व पुनम शिरसाट हिनेही आपले मनोगत व्यक्त केले आभार कुमारी पूजा गायकवाड हिने केले व एन .एस .एस (NSS) चे महत्व इंग्रजी मध्ये स्वयंमसेविका -निशा दाभाडे हिने सांगितले .