उद्या करमाळ्यात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन आयोजित

करमाळा(दि.१८) : महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे उद्या (दि.१९) करमाळा येथे कीर्तन आयोजित केलेले आहे.
यशवंतराव चव्हाण फाउंडेशन करमाळा यांच्यावतीने माजी आमदार स्व. नामदेवराव जगताप यांच्या जयंतीनिमित्त हे कीर्तन आयोजित करण्यात आलेले आहे. उद्या दुपारी साडेतीन वाजता यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या पाठीमागील मैदानात हे कीर्तन होणार आहे. या कीर्तन सोहळ्याचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.




