मुथा अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सुयश

करमाळा(दि.२४): करमाळा येथील मुथा अबॅकस अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी पुणे येथे १९ जानेवारीला झालेल्या अरिस्टो किड्स अंतर्गत ऑफलाइन आंतराष्ट्रीय अबॅकस व वैदिक स्पर्धेत घवघवीत यश मिळवलेले आहे. या स्पर्धेत २३ देशातील ३ हजार+ विद्यार्थ्यांनी विविध लेवल मधून सहभाग नोंदवला होता. यात मुथा अकॅडमीचे ५६ विद्यार्थी सहभागी झाले होते.

या स्पर्धेत विद्यार्थ्यांना 10 मिनिटात अबॅकस साठी 75 गणिते अचूक सोडविणे अनिवार्य होते. यामध्ये मुथा अकॅडमी च्या विद्यार्थ्यांनी विविध लेव्हल्स मधून क्रमांक मिळविले आहेत. यात पुढील विद्यार्थी आहेत –
- विवान दिनेश मेहेर – आंतरराष्ट्रीय रँक १
- आदित्य अभिजीत दुधे – आंतरराष्ट्रीय रँक २
- सार्थक वनारसे – आंतरराष्ट्रीय रँक ३
- सार्थक संजय करंडे – आंतरराष्ट्रीय रँक ४,
- स्वरा प्रीतम बलदोटा – आंतरराष्ट्रीय रँक ६
- शरवरी रोहित शिंदे – आंतरराष्ट्रीय रँक ७
- प्रणील अनिल वैद्य – आंतरराष्ट्रीय रँक ४९
- सुयश दयानंद चौधरी – आंतरराष्ट्रीय रँक १९
- श्रावणी रामेश्वर खराडे – आंतरराष्ट्रीय रँक ७
- आर्यन तात्यासाहेब जाधव – आंतरराष्ट्रीय रँक18
- अथर्व गहिनीनाथ बनसोडे – आंतरराष्ट्रीय रँक ३२
- साद बागवान आंतरराष्ट्रीय रँक – 50
- रिद्धी प्रशांत शिंदे आंतरराष्ट्रीय रँक- 54
- प्रतीक जालिंदर सावंत आंतरराष्ट्रीय रँक -55
- राजवी चिन्मय मोरे – आंतरराष्ट्रीय रँक – 58
- आरुष बलभीम बनसोडे -आंतरराष्ट्रीय रँक – 18
- आदींश आशिष मेहता – आंतरराष्ट्रीय रँक 125
- शंभुराजे प्रफुल्ल शिंदे – आंतरराष्ट्रीय रँक 93
- शिवतेज वर्धमान जाधव – आंतरराष्ट्रीय रँक 77
- ऋषिराज वीरेंद्र लष्कर – आंतरराष्ट्रीय रँक 52
- रिदम भूपेंद्र बोराडे – आंतरराष्ट्रीय रँक 9
- शरयू रघुनाथ फरतडे – आंतरराष्ट्रीय रँक 11
- अन्वी अमोल हिरण – आंतरराष्ट्रीय रँक 50
- रियांशी प्रणित कुमार जैस्वाल – आंतरराष्ट्रीय रँक 45
- ईश्वरी भारत मुकणे – आंतरराष्ट्रीय रँक 30
- साई सागर काळे – आंतरराष्ट्रीय रँक 59
- यश नरेश शहा – आंतरराष्ट्रीय रँक 21
- स्पंदन बापू घरबुडे – आंतरराष्ट्रीय रँक 16
- आर्यन शामराज कापसे – आंतरराष्ट्रीय रँक 102
या सर्व विद्यार्थ्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर करमाळ्याचे नाव लौकिक केले आहे. सर्व विद्यार्थ्यांचे यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे-पाटील व अॅड. बाबुराव हिरडे, श्रेणिक खाटेर यांच्याकडून कौतुक करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना अबॅकस अकॅडमीच्या संचालिका ज्योती मुथा यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. तसेच स्मिता वनारसे, पूजा शिंदे यांनीही मार्गदर्शन केले.
अबॅकस वैदिक maths मुळे लहान वयात विद्यार्थ्यांचा मेंदूचा विकास जास्तीत जास्त होऊन त्यांचा मेंदू कॅल्क्युलेटर पेक्षाही गतीने काम करत असतो. याचा उपयोग शालेय अभ्यासात प्रगती होण्यासाठी व प्रत्येक स्पर्धात्मक परीक्षेसाठी होतो.
● ज्योती मुथा, संचालिका – मुथा अबॅकस अकॅडमी, करमाळा






