कलाम फौंडेशनच्या वतीने विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अन्नदान कार्यक्रम -

कलाम फौंडेशनच्या वतीने विविध महापुरुषांच्या जयंतीनिमित्त अन्नदान कार्यक्रम

0
श्रीराम प्रतिष्ठानच्या अन्नदानाच्या लाभार्थ्यांना कलाम फौंडेशनकडून अन्नदान करण्यात आले

करमाळा (दि.१७) – भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम फाऊंडेशन करमाळा व सकल मुस्लीम समाज करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम प्रतिष्ठान येथे १० एप्रिल महावीर जयंती, ११ एप्रिल महात्मा फुले जयंती, १२ एप्रिल हनुमान जयंती आणि १४ एप्रिल विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सर्व महापुरुषांच्या स्मरणार्थ एक आगळा-वेगळा अन्नदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी किरदार सर, प्रा. श्रीकांत (पिंटू) कांबळे सर, शिवजयंती उत्सव समितीचे सचिन काळे, अॅड. नईम काझी, सकल मुस्लीम समाज करमाळा चे शहराध्यक्ष जमीर सय्यद, डॉ. ए. पी. जे. फाऊंडेशनचे सचिव रमजान बेग, रोहित पवार फाउंडेशनचे सदस्य मुस्तकीम पठाण, प्रा. जाधव सर, प्रा. भोंग सर आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक सलोखा, ऐक्य व धर्मनिरपेक्षतेचा संदेश देण्यासाठी करण्यात आले होते. अन्नदानाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना सेवा देण्याचा प्रयत्न यशस्वीरीत्या पार पडला.

सुलेखन– प्रशांत खोलासे, केडगाव(ता.करमाळा)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!