विविध व्यवसायानंतर शाश्वत शेतीसाठी सेंद्रियखताचा नवा व्यवसाय-विजयराव पवार यांचा नवा मार्ग -

विविध व्यवसायानंतर शाश्वत शेतीसाठी सेंद्रियखताचा नवा व्यवसाय-विजयराव पवार यांचा नवा मार्ग

0

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर विविध प्रयोग व विविध व्यवसाय करणे जवळपास अशक्य  असते, पण काही धाडसी लोक असे धाडस करतात  आणि प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होत नवा अनुभव  घेतात. असे लोक दुर्मिळ असतात,  अशा दुर्मिळ व्यक्तिमत्वात विजयराव धोंडीराम पवार यांचे नाव आहे.हे नाव केवळ करमाळ्यातच नव्हे, तर संपूर्ण तालुक्यात  सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक क्षेत्रात आपला ठसा उमठवणारे व्यक्तिमत्त्व आहे.

सैन्यातील सुभेदार कै. डी. जी. पवार यांचे ते सुपुत्र. शिक्षणाची पायाभरणी करमाळ्यातच झाली. बी.काॅम. नंतर, पुण्यातून एम.कॉम पूर्ण करून, त्यांनी  नोकरीच्या  नादी न लागता व्यवसायात उडी घेतली. सन 1990 मध्ये व्यवसाय क्षेत्रात त्यांनी पहिले पाऊल टाकले. त्यावेळी त्यांनी विजय  ॲटोमोबाईल नावाचे दुकान  सुरू केले. या व्यवसायात जम बसल्यानंतर , जेसीबी, पोकलेन मशिनरी खरेदी करून जोरदार व्यवसाय केला. त्यानंतर बजाज टू व्हीलर व टाटा मोटर्सची सबडीलरशीप घेतली.  त्यानंतर ‘प्रगती टायर्स’ या नावाने टायर्स व्यवसायातही उज्वल यश संपादन केले.

दरम्यान केवळ व्यवसायापुरते मर्यादित न राहता, त्यांनी वडिलोपार्जित शेतीला आधुनिकतेची जोड देऊन ती सिंचनाखाली आणली आणि स्वतः जातीने ती फुलवली. त्यानंतर त्यांनी  शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकत बीसीए, बीबीए, बी.एस्सी.चे  रणजितसिंह मोहिते-पाटील या नावाने  महाविद्यालय सुरू केले. प्रचंड स्पर्धा व शासकीय अनुदानाचा अभाव यामुळे हे महाविद्यालय त्यांना तीन वर्षानंतर बंद करावे लागले.

याबरोबरच त्यांनी सामाजिक कार्याची नाळ जोडली. श्री. पवार  यांनी दिगंबरराव बागल कला-क्रीडा मंडळ स्थापना केले.त्याद्वारे विविध उपक्रम राबवले.राजकारणात माजी मंत्री कै. दिगंबरराव बागल, आ. रणजितसिंह मोहिते-पाटील , विलासराव घुमरे यांच्यासोबत काम केले. नुसतेच काम केले नाहीतर त्यांच्या माध्यमातून अनेक गरजूनां जाॅब मिळवून दिले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष, महाबीजचे ‘संचालक’ अशा अनेक जबाबदारीच्या पदांवर त्यांनी आपली कारकीर्द घडवली. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांचे ते नातेवाईक असून त्यांच्या माध्यमातून ते महाबीज चे संचालक झाले होते.

आणखीन एक विशेष म्हणजे त्यांना दोन्ही मुलीच आहेत.  श्री. पवार  व सौ. वंदना पवार यांनी मुलाचा अट्टाहास न करता आपल्या दोन्ही कन्याना अभियंता बनवले  आहे.मोठी कन्या रेशम ही पुणे येथे  ‘सायबेज’ कंपनीत जॉब करते तर जावई ॲड.रोहन चोपडे पुणे येथे वकीली व्यवसाय करत आहेत. छोटी कन्या कु.प्रगती एम.एस.शिक्षणासाठी  अमेरिकेतील टाॅप पाच विद्यापीठातील एका विद्यापीठात शिक्षण घेत आहे.

आता मात्र त्यांची नजर शाश्वत शेतीकडे  वळली आहे. सेंद्रिय शेती म्हणजे आजच्या काळाची गरज – आरोग्यदायी अन्न, निसर्गाशी सुसंवाद साधणारा  शेतीचा मार्ग. ही गरज ओळखून विजयराव पवार यांनी सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या राघवेंद्र फर्टिलायझर कंपनीचे सेंद्रिय खत विक्रीचा नवा व्यवसाय “स्वामी समर्थ ”  नावाने सुरू केला आहे.

हे केवळ खतांचे दुकान नाही, तर पर्यावरणस्नेही, शेतकरीहिताचे एक केंद्र होत आहे. सेंद्रिय शेतीला चालना देणारा एक प्रयत्न आहे. प्रदूषणमुक्त, आरोग्यपूर्ण अन्ननिर्मितीचा मूलमंत्र यातून मांडला जात आहे.आज शेतकऱ्यांना हवी असते पारदर्शकता, विश्वास, आणि अनुभवाचा आधार. विजयराव पवार यांचा अनुभव, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी ही या नव्या प्रवासाची खरी ताकद आहे. करमाळा आणि परिसरातील शेतकऱ्यांसाठी हे दुकान सेंद्रिय शेतीकडे नेणारी नवसंजीवनी ठरणार आहे.

✍️ डॉ.अ‍ॅड.बाबूराव हिरडे,करमाळा, जि. सोलापूर मो.९४२३३३७४८०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!