मंडल अधिकाऱ्याचा जबाब फाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर -

मंडल अधिकाऱ्याचा जबाब फाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

0

केम (संजय जाधव) : महसुली कामकाजादरम्यान मंडल अधिकाऱ्याच्या हातातील अधिकृत दस्तऐवज जबरदस्तीने फाडल्याप्रकरणी व सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी विकास बाळू देवकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.

बार्शी न्यायालयात यासंदर्भात खटला सुरु होता. ११ जुलै रोजी विकास बाळू देवकर यांना न्यायालयाकडून ५०,००० रुपयांच्या वैयक्तिक हमीवर अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. अ‍ॅड. मंगेश अनिरुद्ध अरणाळे यांनी त्यांचे कामकाज पाहिले.

हा प्रकार १८ जून २०२५ रोजी केम (ता. करमाळा) येथे घडला होता. मंडल अधिकारी मीरा नागटिळक यांनी करमाळा पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली होती. त्या केम येथे वादग्रस्त जमिनीसंदर्भात पाहणीसाठी गेल्या असता, विकास देवकर यांनी त्यांच्या हातातील जबाब फाडून नवीन जबाब घेण्याचा दबाव टाकून शिवीगाळ केली असल्याचा आरोप दाखल केलेल्या तक्रारीत केला होता. विकास देवकर हे पिंपरी-चिंचवड येथे पोलीस शिपाई म्हणून कार्यरत आहेत.

मंडल अधिकाऱ्याच्या जबाबाची फाडाफाड; पोलीसावर गुन्हा दाखल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!