महादेवी हत्तीण परत आणण्यात यावी यासाठी करमाळा तालुक्यात स्वाक्षरी मोहिम -

महादेवी हत्तीण परत आणण्यात यावी यासाठी करमाळा तालुक्यात स्वाक्षरी मोहिम

0

करमाळा (संदेश प्रतिनिधी) : (ता.१) जिनसेन स्वस्तिश्री जैन मठ, नांदणीची  लाडकी हत्तीणी माधुरी (महादेवी) हिला पुन्हा कोल्हापूरला आणण्यासाठी शिवजयंती उत्सव समिती, करमाळा शहर व तालुका यांनी पुढाकार घेतला असून, रविवारी ३ ऑगस्ट रोजी सकाळी ११.०० वा. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, छत्रपती चौक, करमाळा येथे सर्व नागरिकांनी स्वाक्षरी मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन शिवजयंती उत्सव समिती, करमाळा शहर व तालुका यांनी केले आहे.

ही मोहीम माधुरी (महादेवी) हत्तीणीला पुन्हा तिच्या मूळ स्थळी आणण्यासाठी जनतेच्या भावना आणि समर्थन व्यक्त करण्यासाठी राबवण्यात येत आहे. अनेक भक्त आणि नागरिक हत्तीणीबाबत विशेष आपुलकी बाळगतात. त्यामुळे हा निर्णय अधिक जनमानसाच्या पाठबळाने साकार व्हावा, यासाठी सामूहिक प्रयत्न सुरु आहेत.या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या स्वाक्षरीच्या माध्यमातून आपणही या ऐतिहासिक आणि भावनिक मोहिमेत आपला सहभाग नोंदवू शकता. असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.

काय आहे प्रकरण? – कोल्हापूर मधील नांदणी मठात असलेल्या महादेवी हत्तीणीचा वन विभागाच्या परवानगीशिवाय मिरवणुकीसाठी वापर झाल्याचा आरोप ‘पेटा’ने केला. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर समितीने तपास करून हत्तीणीच्या कल्याणासाठी गुजरातमधील वनतारा येथे हलवण्याची शिफारस केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध मठाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली, मात्र ती फेटाळली गेली. त्यामुळे महादेवी हत्तीणीला वनतारा येथे हलवण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!