आषाढी वारी निमित्त कंदरमधील भांगे शाळेची बालदिंडी उत्साहात…
करमाळा / संदेश प्रतिनिधी : संदीप कांबळे :
कंदर : कंदर (ता.करमाळा) येथील शंकराव भांगे मालक प्राथमिक विद्या मंदिर या शाळेतील विद्यार्थ्यांची बालदिंडी मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात पार पडली, यावेळी कंदर मधील मुख्य चौकातील पहिल्यांदाच स्थापना करण्यात आलेल्या श्री विठ्ठलाच्या मूर्ती समोर बाल वारकरी यांनी भजन सादर केले.
यावेळी विठ्ठल आरती प्रवीण देवकर आणि त्यांच्या पत्नी पुजा देवकर यांच्या हस्ते झाली. त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून दिंडी सोहळा संपन्न झाला.दिंडी सोहळा साजरा करण्यासाठी संस्थेचे सचिव सुनिल भांगे सहशिक्षिका ज्योती कांबळे, रेश्मा सायकर, रेखा राखुंडे, सुवर्णा गायकवाड, सुवर्णा अरकिले सौ.अफरोज सय्यद कुराडे स्वाती पूजा कदम मदतनीस उषा सुतार यांनी परिश्रम घेतले. यामध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा. भक्ती भाव या गुणांची संकल्पना मुलांमध्ये रुजावी यासाठी विठ्ठलाच्या पालखीची दिंडी वारीतील फुगडी तसेच रिंगण अशा कार्यक्रमाचे आयोजन करून पालखी सोहळा साजरा झाला.