घारगाव शाळेने विद्यार्थ्यांची दिंडी काढून दिला पर्यावरणाचा संदेश - Saptahik Sandesh

घारगाव शाळेने विद्यार्थ्यांची दिंडी काढून दिला पर्यावरणाचा संदेश

करमाळा/संदेश प्रतिनिधी

करमाळा : “जय जय राम कृष्ण हरी”, “ज्ञानोबा माऊली माऊली तुकाराम”, मुक्ताबाई, जनाबाई ,एकनाथ असा अखंड जयघोष आणि टाळ मृदंगाचा गजर करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घारगाव मधील छोट्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी एकत्रितपणे आज (दि.९) दिंडी काढली होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी हातात भगवे झेंडे व पर्यावरणाचा संदेश देणारे फलक जसे की, “झाडे लावा झाडे जगवा”, ” मुली वाचवा देश वाचवा”, “सुंदर माझे गाव स्वच्छ माझे गाव”, “पाणी वाचवा जलसंवर्धन करा” असे अनेक संदेश देणारे फलक हातात घेऊन पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे आवाहन केले.

विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी, मुक्ताई ,तुकाराम, एकनाथ, जनाबाई डोक्यावर तुळशी वृंदावन गळ्यात माळा विविध संतांची वेशभूषा करून गावात दिंडी काढण्यात आली.
हा बालगोपालांचा सोहळा साजरा करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रामहरी जाधवर सर, बुधवंत सर, खान सर, कानडे सर व शिक्षक -सहशिक्षका असे अनेक जणांनी परिश्रम घेतले. यावेळी घारगावातील पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!