केम येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिंडीचा घेतला अनुभव - Saptahik Sandesh

केम येथील नूतन माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिंडीचा घेतला अनुभव

केम प्रतिनिधी / संजय जाधव
केम : केम (ता.करमाळा) येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने (Nutan primary and secondary highschool kem)आषाढी एकादशी निमित्त आज (दि ९) दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विद्यार्थांच्या हातात भगवा पताका याबरोबरच टाळ,मृदंग, विणा दिला होता. तसेच मुलींनी हातामध्ये विठ्ठल रूखमाईची मूर्ती हातामध्ये घेतली होती. पांडुरंगाचा गजर करीत मुले नाचत होती.

नूतन महाविद्यालयातील दिंडी

हि दिंडी पाहण्यासाठी चौकात नागरिकांनी गर्दी केली होती. हि दिंडि विठ्ठल मंदिरात आल्यानंतर सर्वानी पांडुरंगाचे दर्शन घेतले त्यानंतर वारकऱ्यांच्या नियमाप्रमाणे आरती झाली. त्यानंतर मुलींनी अभंग ,गौळण गायल्या. तसेच फुगडया खेळण्याचा आनंद लुटला. संपूर्ण केम गाव पांडुरंगाच्या नामाने दुमदुमून गेले होते. विशेष म्हणजे या वेळी शिक्षकांनी सुध्दा वारकऱ्यांचा पोशाख घातला होता. या दिंडीत मुख्याध्यापक अर्जुन रणदिवे, सहशिक्षक गायकवाड सर, वनवे सर, पाटिल सर, आवताडे सर,देवकर सर, शिक्षिका श्रीमती केदार कर्मचारी राजेंद्र पेटकर तसेच विद्यार्थी विद्यार्थीनी सहभाग घेतला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!