75 व्या अमृत महोत्सवी दिनानिमित्त फाळणी दिन साजरा व फाळणीतील कुटुंबांचा करमाळा भाजपाकडून सत्कार
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एक भारत श्रेष्ठ भारत संकल्प व नवभारत स्वप्न साकारण्यासाठी स्वातंत्र्याचे 75 वे अमृत महोत्सव व हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत विविध कार्यक्रम साजरे करीत असून 14 ऑगस्ट रोजी फाळणी दिन म्हणजेच विभाजन विभीशिका स्मृती दिवस करमाळा भाजपा कडून साजरा केला गेला. यामध्ये फाळणी दिनाचे अनुभवाबद्दल चर्चासत्र व व्याख्यान कार्यक्रम त्याच बरोबर फाळणीमध्ये स्थलांतरित झालेल्या करमाळ्यातील कुटुंबांचा सन्मान सोहळा साजरा करण्यात आला.
यावेळी भाजपा सरचिटणीस सुहास घोलप, संघटन सरचिटणीस शशिकांत पवार, बजरंग दल प्रांत सुरक्षा प्रमुख संतोष वाळुंजकर, प्रसिद्ध व्यापारी राधेश्याम देवी, सोनू मल्होत्रा, माजी शहराध्यक्ष संजय घोरपडे, माजी शहराध्यक्ष चंद्रकांत राखुंडे, माजी प्रसिद्धी प्रमुख नितीन कांबळे आभाविपचे संतोष कांबळे वंदेमातरम् शक्तिसेनेचे महेश दिवाण, फिरोज शेख, वैभव सपकाळ, अधिराज घोलप आदी प्रमुख उपस्थितीत होते. यावेळी फाळणी दिनाविषयी चर्चासत्र व व्याख्यान संतोष वाळुंजकर यांनी केले तर फाळणीत स्थलांतरित झालेल्या कुटुंबामध्ये करमाळ्यातील श्रीमती बळवंत कौर भगतसिंग गुलाटी, पप्पूशेठ सिंधी, चेतन किंगर आदींचा समारंभ पूर्वक सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमामध्ये चर्चासत्र व व्याख्याना वेळी बोलताना वाळुंजकर म्हणाले की फाळणी वेळच्या दुःखद घटना व त्यांचा इतिहास सांगण्याचे कारणकी इतिहासच आपली भावी पिढी व भविष्य घडवीत असतो त्याच बरोबर फाळणीमध्ये आलेले कुटुंब हे निर्वासित असतानाच त्यांनी शून्यातून विश्व निर्माण करून नव्या पिढीला एक योग्य आदर्श दिलेला आहे तो या पिढीने आत्मसात केलाच पाहिजे तसेच एकलव्य आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांनी फाळणी दिनाचे प्रश्न विचारले असता त्यांना सार्थ उत्तरे देत चर्चासत्र संपन्न केले.कार्यक्रमा वेळी बोलताना घोलप म्हणाले की एकीकडे स्वातंत्र्याचा आनंद साजरा करीत असताना फाळणीमध्ये आपणास भोगाव्या लागलेल्या यातना व दुःख हे शब्दात सांगता येत नाही व आम्ही ते समजू शकत नाही तरी या दिवसाच्या स्मृती प्रित्यर्थ आपण केलेले बलिदान व संघर्ष देश कधीच विसरू शकत नाही आणि हे नव्या पिढीला कळालेच पाहिजे म्हणून आमच्याकडून हा छोटासा सन्मान घेऊन आपल्या ऋणातून काहीअंशी मुक्त होण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. तसेच घोरपडे यांनी शाळेतील मुला मुलींना शौर्य गीत व घोषणा त्यांचे मनोधैर्य वाढवले.
यावेळी सर्व सत्कार मूर्तींचा सन्मान हा भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी श्रीफळ, पुष्प, शाल, फेटा व भारत मातेची प्रतिमा देऊन केला. तसेच यावेळी एकलव्य आश्रम शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक यांना भारत मातेची प्रतिमा देण्यात आली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टी, वंदेमातरम शक्तीसेना, राष्ट्रीय पत्रकार संघ, सनिश्री चॅरिटेबल ट्रस्ट, आदींच्या कार्यकर्त्यांनी तसेच एकलव्य आश्रम शाळेचे मुख्याध्यापक सांगळे सर, शिक्षक वाळुंजकर सर, शिंदे सर, पाटील सर, कलाल सर, जाधव सर, कर्मचारी गायकवाड व मदतनीस काळे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.