राज्यस्तरीय कवितासंग्रहासाठी बुधभूषण पुरस्काराचे आयोजन – कवींना कवितासंग्रह पाठवण्याचे आवाहन

करमाळा/संदेश प्रतिनिधी :
करमाळा,ता.14:”करमाळा तालुका साहित्य मंडळ” यांच्या वतीने ‘काव्यसंग्रहा’ साठी बुधभूषण पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे.याबाबत प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले की,पुरस्काराचे हे पहिले वर्ष आहे. या पुरस्कारासाठी रोख रक्कम पाच हजार रूपये ,सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व फेटा देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी १ जानेवारी २०२१ ते ३१ जुलै २०२२
या कालावधीमध्ये प्रकाशित झालेले कविता संग्रह पात्र आहेत. कविता संग्रहाच्या दोन प्रती,अल्प परिचय व फोटो आवश्यक. कविता संग्रह पाठवण्याची शेवटची तारीख १० सप्टेंबर २०२२ आहे. या तारखेनंतर आलेले कविता संग्रह विचारात घेतले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी. जास्तीत जास्त कवींनी आपले कविता संग्रह पाठवावेत असे आवाहन कवी प्रकाश लावंड व प्राचार्य नागेश माने यांनी केले आहे.
कविता संग्रह पाठविण्याचा पत्ता –
खलील हारून शेख
(७३८७४४६७७१)
शिवाजी नगर,करमाळा
ता.करमाळा.जि. सोलापुर

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!