उजनी 100/% भरली - 'उजनी' चे पूजन म्हणजे 'उजनी'साठी त्याग करणाऱ्या लोकांच्या कृतज्ञतेचा सोहळा - प्रा.गणेश करे-पाटील - Saptahik Sandesh

उजनी 100/% भरली – ‘उजनी’ चे पूजन म्हणजे ‘उजनी’साठी त्याग करणाऱ्या लोकांच्या कृतज्ञतेचा सोहळा – प्रा.गणेश करे-पाटील

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा :
सध्या उजनी धरण १००/% भरले असून, उजनीच्या पाण्याचे पूजन करणे म्हणजे उजनीच्या धरणासाठी त्याग करणाऱ्या लोकांच्या कृतज्ञतेचा सोहळा आहे, असे प्रतिपादन यशकल्याणी सेवाभावी संस्थाचे अध्यक्ष प्रा.गणेश करे-पाटील यांनी व्यक्त केले.

ढोकरी (ता.करमाळा) येथे उजनी धरण 100% भरल्याचा आनंद उत्सव सर्व धरणग्रस्त शेतकरी, ग्रामस्थ व मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. हालगिच्या निनादात ,पेढे वाटून आनंदोत्सव व जलपूजन करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.गणेश करे-पाटील उपस्थित होते. यावेळी शहाजीराव देशमुख यांनी धरणासाठी त्याग केलेल्या लोकांना नागरी सुविधा मिळायला हव्या अशा पद्धतीची मागणी केली व तसेच कृष्णा भिमा योजना पुर्ण करण्याची मागणी केली.

याप्रसंगी सभापती प्रा.शिवाजीराव बंडगर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना उजनी धरणाची माहीती देताना सांगितले की, उजनी धरणासाठी ज्या लोकांनी त्याग केला त्या लोकांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा पाणी पुजनाचा अट्टाहास आहे व भारत साळुंके यांनी आभार मानले. यावेळी उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती चे शहाजीराव देशमुख. प्रा. शिवाजीराव बंडगर. भारत साळुंखे. अर्जून तकीक. दत्ता बापु देशमुख. तानाजी देशमुख. दादासाहेब भोसले. धनंजय गायकवाड. संजय कदम. रामेश्वर तळेकर. गणेश तळेकर. गणेश पाटील. हनुमंत यादव.विठ्ठल शेळकेडाॅ. भाऊसाहेब शेळके.भैरवनाथ बंडगर. हिराजी चौगुले. काकासाहेब बोरकर. महादेव वाघमोडे. अनिल आरकीले. आमर आरकिले. लक्ष्मण मंगवडे. आप्पा आरकीले. हनुमंत धनवे. क् गडदे. देवा पाटील. काका पाटील. नवनाथ वाघमोडे. सुग्रीव खरात. गणेश खरात. पाडुरंग खरात. परमेश्वर खरात. भारत सलगर. बाळु महानवर. सुनिल सांगवे. बापुराव सांगवे. सर. मेनकुदळे सर व देशमुख सर. इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!