पैसे का देत नाही म्हणून चौघांकडून दगड-गजाने तिघांना बेदम मारहाण - Saptahik Sandesh

पैसे का देत नाही म्हणून चौघांकडून दगड-गजाने तिघांना बेदम मारहाण

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.14) :
आत्महत्या केलेल्या मुलीचे दीड लाख रूपये का देत नाही, म्हणून चौघाकडून तिघांना दगड व गजाने बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार ९ ऑगस्टला रात्री १० वा सोगाव (प.) येथे घडला आहे.

याप्रकरणी आनंद बिड्या भोसले (रा.सोगाव पश्चिम) यांनी दिली आहे. त्यात त्यांनी म्हटले की, माझा थोरला मूलगा जितेन्द्र आनंद भोसले यास ज्ञानेश्वर हकीम काळे यांची मूलगी मोहीनीहिच्यासोबत मागील 3 वर्षापूर्वी लग्न झालेले आहे. सून मोहिनी घरात किरकोळ कारणावरून तक्रार झाली म्हणून सुन मोहिनी हिने गळफास घेवून आत्महत्या केली होती. ९ ऑगस्टला नातेवाईक 1) राजेन्द्र हकिम काळे 2) खाज्या हकिम काळे 3) टरलिंग्या हकिम काळे सर्व रा.भगतवाडी व माझा भाऊ मुकंद्या बिड्या भोसले रा. सोगाव यांनी मला व माझा मूलगा जितेन्द्र आनंद भोसले यास म्हणाले की, तूम्ही मोहिनी हिला गळफास देवून मारले आहे, तूम्ही आम्हाला दिड लाख रूपये द्या, असे म्हणाल्यावर मी व मुलगा जितेन्द्र आनंद भोसले 1) राजेन्द्र हकिम काळे यास म्हणालो कि आमचेकडे आता पैसे देणेसाठी नाहीत, असे म्हणताच राजेन्द्र हकिम काळे यांनी मला व मूलगा यास शिवीगाळी करू लागला शिवी देवू नको म्हणत राजेन्द्र हकिम काळे यांनी तेथील दगड उचलून माझा डाव्या डोक्यावर मारून जखमी केले.

Yash collection karmala clothes shop

तसेच तेथील पडलेला गज खाज्य राजेन्द्र काळे यांनी हातात घेवून माझे उजव्या पायाचे नडगीवर व टाचेवर मारून जखमी केले आहे त्यावेळी माझा मूलगा जितेन्द्र हा भांडण सोडविण्यासाठी मध्ये आला असता टरलिंग्या हकिम काळे जितेन्द्रं याचे पाठीवर गजाने व डाव्या हाताचे अंगठ्या जवळ मारून जखमी केट तसेच माझी पत्नी रेणूका, मूलगा शुभम यांना माझा भाऊ मुकीदा बिड्या भोसले यांनी शिवीगाळी करून लाथाबूक्याने मारहाण केली आहे. आम्हाला मार लागल्याने आम्ही ॲब्यूलन्स गाडीने सरकारी दवाखाना करमाळा येथे उपचारासाठी आणले आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Yash collection karmala clothes shop advertise

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!