शेटफळ येथील युवा उद्योजक वैभव पोळ यांची महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी निवड
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी शेटफळ येथील युवा उद्योजक वैभव पोळ यांची निवड झाली आहे. नुकतेच या निवडीचे पत्र संस्थापक अध्यक्ष किरण चव्हाण व राज्य उपाध्यक्ष डॉ. राहुल बच्छाव यांनी दिले आहे.
केळी पिकामध्ये केलेले विविध प्रयोग व केळी उत्पादक विषयी असलेली तळमळ आणि त्याविषयी केलेल्या कामाची दखल घेऊन वैभव पोळ यांची महाराष्ट्र राज्य केळी उत्पादक शेतकरी संघाच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर त्यांचे शेटफळ येथील शेतकरी गटाने तसेच विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.