गटार बंद झाल्याने वयोवृद्ध माय-लेकरांची हेळसांड - Saptahik Sandesh

गटार बंद झाल्याने वयोवृद्ध माय-लेकरांची हेळसांड

समस्या – करमाळा शहरातील सुतार गल्ली (महावीर एजन्सीच्या पाठीमागे) येथे राहणाऱ्या वयोवृद्ध हबीबबी बागवान (वय ८०) व शौकत बागवान (वय ६०) यांच्या घराजवळील गटार गेले वर्षभर तुंबलेली असल्याने उतारवयात या मायलेकरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. घरात दुसरे कोणी जबाबदार नसल्याने नाईलाजाने या समस्येसोबतच हे दोघे अत्यंत दयनीय अवस्थेत दिवस कंठत आहेत.
जुन्या बॅंक ऑफ इंडिया च्या बोळा जवळ गेल्या वर्षी पेवर ब्लाॅकचे काम करण्यात आले. तेव्हापासून ही गटार बंदच आहे. घाण पाणी साचुन राहील्याने त्यात अळ्या झाल्या आहेत, दुर्गंधी पसरली आहे, डासांची पैदास होत आहे त्यामुळे घरात पाणी वापरता येत नाही. नगर पालिकेचा कार्यकाळ संपल्यामुळे माजी लोकप्रतिनिधींजवळ अधिकार राहीलेले नाहीत. नगरपालिकेवर प्रशासक नियुक्त असल्याने या वयोवृद्धांनी तिथपर्यंत आपली समस्या मांडण्यासाठी मर्यादा येत आहेत. आगामी नगरपालिका निवडणुका लांबणीवर पडल्याने इच्छुक भावी नगरसेवकांचाही हिरमोड झाला आहे. त्यामुळे या उपेक्षित कुटुंबाने आपली समस्या कुणाकडे मांडावी, हा मोठा प्रश्नच आहे. तरी प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे.

समस्या सोडवण्याची अपेक्षा कुणाकडून – करमाळा नगरपालिका

समस्या मांडणारे – विशाल सुरेश परदेशी, सुतार गल्ली, करमाळा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!