राशीन पेठेतील गटारीची जाळी धोकादायक
समस्या – शहरातील राशीनपेठेतील गुगळे किराणा दुकान ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा दरम्यानच्या वळणावर गटारावरील लोखंडी जाळी सदोष आहे.
गटार तुंबल्यानंतर ती व्यवस्थित काढता यावी म्हणून गटारी वर नगरपालिकेने लोखंडी जाळी या वळणावर टाकली आहे. परंतु सदर जाळी एका बाजूने समतल आहे तर एका बाजूला खोलगट भागात बसवलेली आहे. त्यामुळे तेथे अनेकदा दुचाकींचे अपघात घडले आहेत. ही जाळी जड वाहनांच्या ओझ्याने वाकलेली आहे. शहरातील सर्व गणेश विसर्जन मिरवणुका याच मार्गाने जातात. गणेश विसर्जन मिरवणूक नेताना मंडळांनी काळजीपूर्वक आपली वाहने काढणे आवश्यक आहे.
पाणी पुरवठा, स्वच्छता, नागरीकांच्या अडीअडचणींबाबत सध्या नगरपालिका उदासीन असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सदर वळणावर मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वतःच काळजी घेत विसर्जन मिरवणुका पुढे नेण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
समस्या सोडविण्याची अपेक्षा कुणाकडून – करमाळा नगरपालिका
समस्या मांडणारे – विशाल परदेशी, करमाळा. मो. ९४२३५२५५८१