श्री छत्रपती शिवाजी तरूण मंडळाचा उपक्रम समाजपयोगी : पोलिस निरीक्षक गुंजवटे
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : श्री छत्रपती शिवाजी तरूण मंडळाचा उपक्रम समाजपयोगी असून असे उपक्रम सर्व गणेश मंडळाने राबवावेत; असे आवाहन पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी केले आहे. करमाळा शहरातील सावंत गल्ली येथील छत्रपती शिवाजी तरूण मंडळाचे “जोतिबाची काठी” या देखाव्याचे उद्घाटन तहसीलदार समीर माने, गट विकास अधिकारी मनोज राऊत, पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, नगरपालिकेचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे, मुख्यमंत्री आरोग्य विभाग राज्याचे प्रमुख मंगेश चिवटे, अध्यक्ष महेश चिवटे, ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ.ॲड बाबुराव हिरडे, डॉ.हरीदास केवारे, डॉ.रोहन पाटील यांच्या हस्ते झाले.
त्याप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार समीर माने हे होते. प्रमुख पाहूणे म्हणून नायब तहसीलदार श्री.जाधव, सुभाष बदे हे होते. यावेळी मुख्यमंत्री सहायता कक्षाचे प्रमुख म्हणून निवड झाल्याबद्दल मंगेश चिवटे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सावंत गटाचे नेते सुनील सावंत यांचे हस्ते झाले. यावेळी डॉ.ॲड.बाबूराव हिरडे, शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे, तहसीलदार माने, गटविकास अधिकारी मनोज राऊत यांची भाषणे झाली.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष दादासाहेब सावंत, नगरसेवक संजय सावंत, डॉ. रोहित पाटील, माजी नगरसेवक फारूक जमादार, दिपक सुपेकर, गोविंद किरवे, खलील मुलाणी, विठ्ठल सावंत, मार्तंड सुरवसे, शाहरूख मुलाणी, राजेंद्र काळे, पांडूरंग सावंत, समाधान सुरवसे, दत्ता कांबळे, अशोक दोशी, उत्कर्ष गांधी, निलेश दोशी, वाजीद शेख, अनंता काकडे, सागर सामसे, योगेश काकडे, आनंद रोडे, नागेश उबाळे आदी उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत मंडळाचे अध्यक्ष गणेश सावळकर, उपाध्यक्ष बापू उबाळे यांनी केले. सूत्रसंचालन निशांत खारगे यांनी केले तर आभार पंचायत समिती सदस्य ॲड. राहूल सावंत यांनी मानले.