मंगेश चिवटे यांचे कार्य प्रेरणादायी – श्रेणीकशेठ खाटेर
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : समाजामध्ये शंभर टक्के लोकांपैकी ९७ टक्के लोक हे प्रवाहाच्या बरोबर चाकोरीबद्ध जीवन जगत असतात, तीन टक्के लोक प्रवाहाच्या विरुद्ध जीवन जगून जीवनामध्ये एक निश्चित ध्येय ठेवुन सर्व संकटाचा सामना करून यशाचे शिखर गाठतात, अशा तीन टक्के लोकांपैकी मंगेश चिवटे हे असून त्यांचे कार्य कौतूकास्पद प्रेरणादायी असून, त्यांचा करमाळावासीय असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो असे मत गुरूगणेश दिव्यरत्न गोशाळा गोशाळाचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते श्रेणीकशेठ खाटेर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री सहायता वैद्यकीय कक्षाच्याप्रमुखपदी मंगेश चिवटे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार गुरुगणेश दिव्यरत्न गोशाळेच्यावतीने करण्यात आला. यावेळी ते बोलत होते पुढे बोलताना ते म्हणाले की, मंगेश चिवटे यांच्या पाठीशी आई-वडिलांचे आशिर्वाद पुण्याई असून मोठे बंधू महेश चिवटे यांचे पाठबळ असल्यामुळे मंगेश चिवटे यांची महाराष्ट्र राज्याच्या महत्त्वाच्या पदावर नियुक्ती झाली आहे. एवढ्या लहान वयामध्ये मोठी जबाबदारी मिळाली असून भविष्यात त्यांना देश पातळीवर काम करण्याची संधी नक्की मिळेल असे त्यांनी मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास पत्रकार दिनेश मडके वर्धमान खाटेर, कॉन्ट्रॅक्टर अनिल पाटील चरणसिंग परदेशी भाजपा शहराध्यक्ष जगदीश आगरवाल उद्योजक स्नेहल कटारिया प्रितम राठोड प्रविण गंधे विजय बरिदे गिरीश शहा वैभव दोशी, गणेश बोरा,उपस्थित होते.