डॉ.मच्छिंद्र नांगरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

Dr. Machindra Nagare

केम ( प्रतिनिधी- संजय जाधव) :
केम तालुका करमाळा येथील श्री उत्तरेश्वर ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक साहित्यिक डॉ. मच्छिंद्र नांगरे यांना सोलापूर येथील लायन्स क्लब ऑफ सोलापूर मिडटाऊनच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार त्यांना सोमवारी १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता सोलापूर येथे दिला जाणार आहे.

लायन्स क्लब ऑफ सोलापूर मिडटाऊनच्या वतीने देण्यात येणारा आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा नुकतीच प्रेसिडेंट ऍड. अमित आळंगे यांनी सोलापूर येथील पत्रकार परिषदेत केली.

या पुरस्काराचे वितरण व्दितीय ऊपप्रांतपाल लायन, ऍड.एम.के. पाटील, माजी प्रांतपाल लायन डॉ व्यंकटेश, यजुर्वेदी आणि झोन चेअरमन लायन गोविंद मंत्री या मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.

या पुरस्काराबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर व धाराशिव, सोलापूर जिल्ह्यातील संस्थेच्या काॅलेज मधील सर्व प्राध्यापक,प्रचार्य यानी डाॅ, मच्छिंद्र नांगरे यांचे कौतुक केले आहे.

kem news | Dr. Machindra Nagare | Idol Teacher Award | Adarsh Shikshak Puraskar | Lions club solapur award Midtown| saptahik sandesh| marathi News | Karmala Solapur Batmya

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!