करमाळा शहरात पाण्याची टंचाई - प्रशासनाचा ढिम्म कारभार नागरी सुविधा न दिल्यास आंदोलन करणार नगरसेविका : स्वातीताई फंड - Saptahik Sandesh

करमाळा शहरात पाण्याची टंचाई – प्रशासनाचा ढिम्म कारभार नागरी सुविधा न दिल्यास आंदोलन करणार नगरसेविका : स्वातीताई फंड

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : सध्या गणपतीचे दिवस, ऐन सणासुदीमध्ये पाण्याच्या टंचाईने करमाळा शहरातील नागरिक हैरान झाले असुन, प्रशासनाचा ढिम्म कारभार असल्यामुळे नागरिकांना नागरी सुविधेपासुन वंचित रहावे लागत आहे, पाण्याचा प्रश्न ताबडतोब मार्गी न लावल्यास घागर मोर्चा काढण्याचा नगरसेविका स्वातीताई फंड यांनी दिला आहे.

करमाळा नगरपालिकेवर सध्या प्रशासक असल्यामुळे नगराच्या सुविधेबाबत नगरसेवक व प्रशासन यांच्यात सुसंवाद नसल्याने मुख्याधिकारी प्रांत अधिकारी यांचे नागरी सुविधा देण्याकडे दुर्लक्ष होत असुन त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

सध्या पावसाळयाच्या दिवसात पाणी टंचाई,शहरात असणारी अस्वच्छता गटारीच्या कडेला वाढलेली झाडेझुडपे त्यामुळे गटारीच्या स्वच्छता न करता आल्यामुळै तुंबलेल्या गटारी महावीर उद्यान, गणेशनगर शाहुनगर,कृष्णाजीनगर,या भागातील बागेत झाडझुडपे वाढल्याने साप, विंचु, यांचे भय असुन रोगराई होण्याची परिस्थिती असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

उजनी धरण शंभर टक्के पुर्ण भरूनही करमाळा शहराला पाणी नगरपालिका पाणी पुरवठा करु शकत नाही हे मोठे दुर्दव असुन धरण उशाला कोरड घशाला अशी परिस्थिती असुन पाण्याचा प्रश्न तात्काळ सोडवुन पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास करमाळा नगरपालिकेवर आंदोलन करण्याचा इशारा मा.पाणीपुरवठा सभापती मा.बांधकाम सभापती स्वातीताई महादेव फंड यांनी दिला आहे.

Swati Mahadev Phand | Karmala Nagarsevika | Karmala Nagarpalika| Nagarparishad News | Water Shortage in Karmala | Saptahik Sandesh

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!