उत्तरेश्वर मंदिरातील अखंड १३ तास जपात १५० भाविकांचा सहभाग
केम (प्रतिनिधी-संजय जाधव) : करमाळा तालुक्यातील केम येथील जागृत ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरात चौथ्या श्रावणी सोमवार निमित्त श्री ऊत्तरेश्वर रक्त दाते संघटना व श्री ऊत्तरेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने १३ तास अखंड ओम नमः शिवाय या जपाचे आयोजन करण्यात आले होते.
सुरूवातीला ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर महाराजांच्या प्रतिमेचे पुजन चेअरमन दादासाहेब गोडसे यांच्या हस्ते झाले. या वेळी विश्वस्त मनोज सोलापूरे, अरूण वासकर, भाऊसाहेब बिचीतकर, मोहन दौड विजय तळेकर उपस्थित होते. या जपासाठी एकूण १५० भाविकांनी सहभाग नोंदवला. यातले एक वैशिष्ट्य म्हणजे दत्तात्रय कुलकर्णी या दिव्यांग भाविकाने अखंड तेरा तास जप केला. या गोष्टीचे केम परिसरातील भाविकांनी कौतुक केले.
हे जप सकाळी सात ते सायंकाळी सात पर्यंत चालू होते. सायंकाळी सात वाजता ऊत्तरेश्वर रक्त दाते संघटनेचे अध्यक्ष भैरू शिंदे व त्यांच्या पत्नी यांनी आभार मानले. त्यानंतर नित्यनेमाने सायंकाळी साडे सात वाजता श्रीची आरती झाली. त्यानंतर मंदिरामध्ये प्रथमच दहिहंडी फोडण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. लहान मुलाने दहिहंडी फोडली. त्यानंतर सर्व भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी ऊत्तरेश्वर रक्त दाते संघटना व ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.