सालसे येथील गंगुबाई पवार यांचे वृद्धापकाळाने निधन

करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : सालसे (ता.करमाळा) येथील गंगुबाई ऊत्तम पवार (वय-93) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली व नातवंडे असा परिवार आहे. अभिनव भारत समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष संतोष राऊत यांच्या आईच्या आई (आजी) होत्या. त्यांच्या पार्थिवावर पवार वस्तीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी अनेक मान्यवर तसेच नातेवाईक उपस्थित होते.