पोलिसांना फोनद्वारे खुन झाल्याचे कळवली खोटी माहिती – एकावर गुन्हा दाखल

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : धायखिंडी (ता.करमाळा) येथे खून झाला आहे, अशी खोटी माहिती देवून पोलिसांना फोनद्वारे कळवली व पोलिसांची दिशाभूल केली या प्रकरणी एकाजणाविरुद्ध करमाळा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी पोलिस नाईक प्रदीप जगताप यांनी फिर्याद दिली आहे. यात रोहन दिलीप सोरटे रा.श्रीदेवीचामाळ असे संशयित आरोपीचे नाव असून त्याने नागरिकांना अडचणीच्या काळात तात्काळ मदत व्हावी, पोलिसांनी ११२ या क्रमांक मदतीसाठी उपलब्ध केला आहे. या क्रमांकावर संशयित आरोपीने मोबाईलवरून पोलिसांना धायखिंडी (ता.करमाळा) येथे खून झाला आहे अशी खोटी माहिती दिली. यानंतर पोलिसांनी गावात जाऊन चौकशी केली, तेव्हा गावात असा प्रकार घडला नसल्याबाबत समजले.

त्यावरून करमाळा पोलिसांनी फोन आलेल्या नंबरची माहिती घेतली. तेव्हा हा बनावट कॉल असल्याचे समोर आले. यानंतर सदर आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर यापुढे जर अशी खोटी माहिती कोणी दिली तर त्याची गय केली जाणार नाही असा इशारा पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांनी दिला आहे. 112 नंबर हा नागरिकांची सुविधा व्हावी म्हणून देण्यात आला आहे. याचा कोणीही गैरवापर करू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, असाही इशारा श्री.कोकणे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!