२० हजार घेतल्याच्या करणावरुन तरुणाला पळवून नेले – एकावर अपहरणाचा गुन्हा दाखल
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा (ता.२४) : २० हजार रुपये घेतल्याच्या करणावरुन एका जणाने तरुणाला पळवून नेवून गेस्ट हाऊसवर बंदिस्त केले असल्याचा प्रकार भाळवणी (ता.करमाळा) येथे घडला आहे. या प्रकरणी जेऊर (ता.करमाळा) येथील एकावर करमाळा पोलिसांनीअपहरणाचा गुन्हा केला आहे. ही घटना २० ऑगस्टला सकाळी १० वाजता घडली आहे.
याप्रकरणी तानाजी बाळु फरतडे (वय २१) भाळवणी (ता.करमाळा) याने करमाळा पोलिसात फिर्याद दिली असून त्यात त्याने म्हटले कि, २० ऑगस्टला सकाळी १० वाजता माझे राहते घरी माझे आई, वडील, भाऊ असे सगळे असताना आमच्या ओळखीचा जेऊर येथील रहिवासी सनी टकले हा आमचे घरी आला व माझा भाऊ राहुल याला पुणे येथील गुलटेकडी मार्केटला घेवुन जायचे आहे, असे म्हणाला व तो माझा भाऊ राहुल याला घेवुन गेला.
त्यावेळी माझे भावाजवळ मोबाईल होता. दुसऱ्या दिवशी २१ ऑगस्टला माझे भावाचे मोबाईल क्रमांकावर फोन करुन पाहिला असता, त्याचा फोन बंद होता. त्यानंतर आण्णासाहेब पारेकर रा.पांगरे ता.करमाळा याने मला सनि टकले याचे गेस्ट हाउसवर ये असे म्हणाला, त्यामुळे मी सनि टकले यांचे मलवडी हद्दीतील गेस्ट हाउसवर गेलो तेथे सनि टकले व आण्णासाहेब पारेकर हजर होते. त्यानंतर माझे भावाबाबत सनि टकले व आण्णासाहेब पारेकर यांना विचारणा केली असता सनि टकले म्हणाला की, तुझ्या भावाकडे माझे 20,000/रु. होते म्हणुन मी त्याला उचलुन आणले होते. परंतु तुझा भाऊ राहुल माझे गेस्ट हाउसवरुन काल संध्याकाळीच पळुन गेला आहे तु तुझ्या भावाने माझ्याकडुन घेतलेले पैसे दे नाहीतर तुझ्या भावाला माझ्या शेतामध्ये कामाला ठेवीन.
त्यानंतर मी त्याला म्हणालो की मी माझ्या भावाने घेतलेले पैसे देवून टाकीन माझा भाऊ कोठे आहे सांगा ? तेव्हा सनि टकले म्हणाला की, तुझा भाउ माझ्या गेस्ट हाउस वरुन पळुन गेला आहे. त्यानंतर दि.२२ ऑगस्ट व २३ ऑगस्ट ला मी माझे भावाचा आमचे नात्यातील लोकांकडे चौकशी केली असता तो कोठेही मिळुन आला नाही व त्याचा फोन नंबरही बंद लागत आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसांनी सनी टकले याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.