केम येथे सोंगाचा कार्यक्रम उत्साहात साजरा
केम ( प्रतिनिधी- संजय जाधव): केम येथील टिळक मित्र मंडळ वासकर गल्लीच्या वतीने सोंगाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गेले दोन वर्षे करोना मुळे हा कार्यक्रम बंद होता. यावर्षी करोना संपल्या मुळे सोंगाचा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे झाला.चौथा सोमवार हा वास्कर गल्लीचा असतो. वास्कर गल्लीच्या तरुण मंडळाच्या वतीने एकूण सहा गाड्या सोंगाच्या काढण्यात आला व शेवटी मधमेश्वर महाराजांचा रथ काढण्यात आला. ही परंपरा फार पुरातन काळापासून चालत आलेले आहे. आज ही परंपरा तरुण मंडळीने जिवंत ठेवलेले आहे. ज्याप्रमाणे कोकणात दशावतार हा साजरा करण्यात येतो. त्याप्रमाणे केम येते श्रावण महिन्यात चारही सोमवारी सांगोच्या गाड्या काढण्याची परंपरा आहे.ऐतिहासिक प्रसंग रामायण महाभारत कालीन दृश्य छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजे औरंगजेबाद आदिलशहा अशी समकालीन पात्र सोमवारी अवतीर्ण होतात.
कोळ्याची गाडी यामध्ये मारुती पळसकर दाऊद शेख,ज्ञानेश्वर तळेकर,सुभाष तळेकर विराज काळसाहित राम रावण गाडी भार्गव भिस्ते,आर्यन गुळवे, गणेश हजारे, ओंकार गिराम,कापूर पठाण, आदिलशहा गाडी, श्रेयस गोसे, ओम वास्कर, समाधान फरट स्वराज्य राजुरे छत्रपती शिवाजी महाराज गाडी राहुल कोरे सौरभ वास्कर समर्थ कोरे अभिषेक कोरे छत्रपती संभाजी राजे गाडी केतन वास्कर ओजेस गोसे गणेश पळसे विलास कौरव-पांडव गाडी ओंकार वास्कर रोहन वास्कर,हर्ष वास्कर,धनंजय सोलापुरे, सौरभ सोलापुरे,रामभाऊ गलांडे यांनी सहभाग घेतला.
या सर्वांचे रंगरंगोटी पेंटर नितीन तळेकर यांनी केली रंगीबेरंगी जात्या पात्र प्रमाणे पोषक गद्या घोडा इत्यादी साहित्य सोंगाच्या कार्यक्रमास लागले सोंगाचा कार्यक्रम पाहण्यासाठी केम पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हा कार्यक्रम हिंदू-मुस्लीम ऐक्याचे दर्शन घडवतो हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी टिळक मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.