पांडे येथील गणेश दुधे यांची ‘यिन केंद्रीय कॅबिनेट उद्योजक समिती कार्याध्यक्ष’ पदी निवड
करमाळा : पांडे (ता. करमाळा) गावचे सुपुत्र व सध्या पुण्यात स्थायिक असलेले गणेश दुधे यांची नुकत्याच झालेल्या सकाळ माध्यम समूहाच्या यिन ‘कॉनक्लेव २०२२’ कार्यक्रमात यिन केंद्रीय कॅबिनेट उद्योजक समिती कार्याध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
ही निवड करताना त्यांचे विविध सामाजिक संस्था मधील राज्यभरातील संघटनात्मक व सामाजिक कार्य आणि युवक वर्गातील संपर्क याचा विचार करण्यात आला.
या निवडीचे स्वरूप ऑनलाईन परीक्षा, मुलाखत आणि सामाजिक कामाचा अहवाल असे होते.
या अगोदर ही दुधे यांनी यिन च्या पहिल्या राज्य मिनिस्ट्री मध्ये पिंपरी – चिंचवड चे पालकमंत्री व विरोधी पक्षनेता पद भूषविले आहे. या कामाची दखल घेऊन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुधे यांचा मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सत्कार करण्यात आला होता.
‘यिन’ च्या माध्यमातुन युवकांना स्वतःचा व्यवसाय उभारण्यासाठी मी येत्या काळात काम करणार आहे.
-गणेश दुधे