कुगाव येथील रक्तदान शिबिरात ६६ जणांनी केले रक्तदान - Saptahik Sandesh

कुगाव येथील रक्तदान शिबिरात ६६ जणांनी केले रक्तदान

Blood donation camp kugav

करमाळा : माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कुगाव येथे नारायण आबा पाटील मित्र मंडळाच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरात ६६ रक्तदात्यांनी रक्तदान केले प्रत्येक रक्तदात्यास प्रमाणपत्र आणि भेटवस्तू यावेळी देण्यात आल्या.

चिखलठाण १ व २,केडगाव, दहिगाव ,जेऊर व कुगाव येथील महिलांनी सहभाग नोंदवला. या शिबिराचे उद्घाटन पृथ्वीराज पाटील यांनी केले. यावेळी पंचायत समितीचे उपसभापती दत्ता सरडे, उपसरपंच मन्सूर सय्यद, माजी सरपंच महादेव पोरे , युवा नेते सागर पोरे ग्रामपंचायत सदस्य अमोल अवघडे ,अशोक गाडे ,मारुती गावडे, तुकाराम हवालदार शिवाजी वायसे ,पांडुरंग काळे, बाबा सय्यद आदी उपस्थित होते देऊन उपसरपंच मन्सूर सय्यद यांनी आभार मानले. या शिबिरासाठी सोलापूरच्या सिद्धेश्वर ब्लड बँकेचे सहकार्य लाभले .

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!