उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजचा 'निसर्ग आपला सखा' उपक्रम संपन्न - Saptahik Sandesh

उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेजचा ‘निसर्ग आपला सखा’ उपक्रम संपन्न

केम ( प्रतिनिधी – संजय जाधव) : श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केम येथील विद्यार्थ्यांची आज ‘ निसर्ग आपला सखा ‘ हा पर्यावरण संरक्षण उपक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी श्री वरद विनायक गणपती मंदिर व वाघोबाची टेकडी येथील निसर्ग सानिध्याचा आनंद घेतला.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमात दहा गाभा घटक आहेत. यातील सातवा गाभा घटक हा पर्यावरण संरक्षण हा आहे. या घटकाला अनुसरून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व , त्याचे संरक्षण आणि समतोल राखण्यासाठी निसर्ग पर्यटन व त्याची सुरक्षितता हे गरजेचे आहे. ज्युनिअर कॉलेजच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात पर्यावरणाची साथसंगत , निसर्ग आपला सोबती , पर्यटनाचे महत्त्व, संरक्षण या मूलभूत घटकांना खूप मोठे स्थान आहे. त्यामुळेच या पर्यटन मोहिमेमुळे येथील विद्यार्थ्यांना वृक्षवल्ली आणि निसर्गाच्या वेगवेगळ्या विलोभनीय रूपाचे आज मनमोहक दर्शन झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी निसर्गदर्शनासोबतच या टेकडीवर वनभोजनाचा आनंद घेतला. त्याच बरोबर नेहमीप्रमाणे आपले सामाजिक उत्तरदायित्व जबाबदारी म्हणून या वाघोबा टेकडीवरील सर्व परिसर स्वच्छ व सुंदर केला.

तेथील प्लास्टिकचा कचरा, रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, काडी कचरा व इतर साफसफाई सर्व विद्यार्थ्यांनी केली.
या निसर्ग संरक्षण पर्यटन उपक्रमासाठी श्री उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज केमचे प्राचार्य श्री एस.बी.कदम यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा.डॉ.मच्छिंद्र नागरे, प्रा.संतोष साळुंखे , प्रा.संतोष रणदिवे, प्रा.सतीश बनसोडे , प्रा.पराग कुलकर्णी , प्रा अमोल तळेकर आणि श्रीमती वृषाली पवार यांचे अनमोल सहकार्य लाभले.

Uttareshwar Junior college Kem News | Karmala News | Saptahik Sandesh News | Batmaya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!