समर नॅशनल अबॅकस स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा करमाळा येथे संपन्न

करमाळा (दि.२) : जेऊर ( ता. करमाळा) येथील जिनियस प्रोऍक्टिव्ह अबॅकस सेंटरच्या २५ विद्यार्थ्यांनीं समर नॅशनल स्पर्धेत यश घवघवीत यश मिळविले असून याबद्दल विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा करमाळा येथील यशकल्याणी सेवा भवन येथे मोठ्या उत्साहात नुकताच पार पडला.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी मनोज राऊत उपस्थित होते तर यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे संस्थापक प्रा. मा. श्री .गणेश करे – पाटील हे होते.

यावेळी सर्व मान्यवरांनी विजेत्या विद्यार्थ्यांना ट्रॉफी , सन्मानपत्र त्याचप्रमाणे यशकल्याणी संस्थेकडून सन्मानपत्र ,मेडल देऊन गौरविण्यात आले.

यावेळी व्यापीठावर चंद्रशेखर शिलवंत. (विश्वस्त तज्ञ) , अशपाक जमादार (राष्ट्रवादी काँग्रेस युवक – उपाध्यक्ष ), सुनीता देवी (संचालिका , नवभारत इंग्लिश मिडीयम स्कूल, करमाळा), सौ .सोनाली शिंदे (संचालिका, लिटिल स्टार अबॅकस अकॅडमी , बार्शी), मा.सभापती सौ.सुनीता निमगिरे आदी मान्यवर उपस्थित होते व मान्यवरांनी देखील मुलांना – पालकांना मार्गदर्शन केले.

अध्यक्षीय भाषणात प्रा. करे पाटील यांनी अबॅकस साठी लागणारी सर्वतोपरी मदत यशकल्याणी संस्था देण्यास कटिबध्द असल्याचे सांगितले. गटविकास अधिकारी मनोज राऊत आपल्या भाषणात म्हणाले की, मुलांचा बौद्धिक विकास होण्यासाठी गणित विषया बरोबर मुलांना पुस्तक वाचनाची आवड असणे गरजेचे आहे. पुस्तकांना आपले मित्र बनवून त्यातून नवीन नवीन गोष्टी मुलांनी आत्मसात केल्या पाहिजेत व स्वतःचे वेगळे असे व्यक्तिमत्व बनवले पाहिजे . मुलांना सृजनशील बनवणे काळाची गरज आहे.

यावेळी श्रीराज झांजुर्णे , दर्श रणदिवे,आरोही पाटील , अनन्या पाटील, ईशान फकीर,अनुज निर्मळ,आदित्य पाटील या विद्यार्थ्यांनी अबॅकसचे प्रात्यक्षिक सादर केले तर सई नलवडे,स्वरा निर्मळ, पलक बलदोटा,आराध्या वेदपाठक, राजवीर बाबर,वेदांती निमगिरे,ईश्वरी काशीद, शरण्या साळुंके, पाथ्रुडकर शाश्वत
या छोट्याश्या मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच पालकांमधून स्वाती बाबर व वैभव पाथ्रुडकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

जिनियस प्रोअॅक्टिव अबॅकस सेंटर च्या संचालिका अंकिता वेदपाठक यांच्या कार्याबद्दल विशेष आभार मानत कौतुक केले .यावेळी कार्यक्रमासाठी पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंकिता वेदपाठक यांनी केले तर आभार प्रदर्शन विष्णु वेदपाठक यांनी मानले.हा कार्यक्रम ययशस्वी रित्या पार पाडण्यासाठी यशकल्याणी संस्थेचे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

keywords : jeur news | Genius proactive abacus centre jeur | Yashkalyani bhavan karmala | saptahik sandesh news karmala | abacus center jeur

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!