महात्मा गांधी विद्यालयात ”जागतिक युवा दिन” साजरा
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : ICTC विभाग उपजिल्हा रुग्णालय करमाळा व महात्मा गांधी ज्यु. कॉलेज ऑफ सायन्स यांच्या संयुक्त विद्यमानाने
जागतिक युवा दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने महात्मा गांधी विद्यालयात HIV विषयक तसेच आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यामध्ये समुपदेशक श्री. कपिल भालेराव यांनी यावर्षीच्या जागतिक युवा दिनाचे घोषवाक्य
(युवकांचा शांतता उभारणीसाठी सहभाग) या दिवसाचे महत्व व यामधील युवकांचा सहभाग असणं मग ते फक्त आरोग्याचं नाही तर समाजातील अनेक घटक आपल्यासाठी किती महत्वाचे आहे यावर प्रकाश टाकला.
त्याचबरोबर HIV/ AIDS यासारख्या जागतिक व सामाजिक समस्येवर मात करायची असेल तर युवकांनाच पुढाकार घ्यावा लागेल असे आवाहन केले.
त्याचबरोबर नानासाहेब चव्हाण यांनी क्षयरोग व इतर संसर्गजन्य आजार, त्यावरील उपचार, आहार, विहार व अश्या कार्यक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासकडेही तेवढेच लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे असे मत मांडले.
या कार्यक्रमासाठी उपजिल्हा रुग्णालय करमाळा चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे तसेच विद्यालयाचे प्राचार्य श्री. कापले पी.ए सर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्यु. कॉलेज विभागप्रमुख प्रा.श्री.विजय पवार सर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ.दिग्विजय लावंड सर यांनी मानले.