खासदार नाईक-निंबाळकर यांच्या सुचनेनंतर केम – टेंभुर्णी रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू
केम ( प्रतिनिधी – संजय जाधव) : केम (ता. करमाळा) येथे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आढावा बैठक घेतली होती. यावेळी केम ग्रामस्थांनी केम-ऊपळवाटे-दहिवली-टेंभुर्णी या रस्त्याची समस्या मांडली होती. खासदार निंबाळकर यांनी याची दखल घेऊन संबधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. त्यानुसार आज प्रत्यक्ष काम सुरू झाले आहे.यामुळे केम ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपाचे केम शहराध्यक्ष गणेश आबा तळेकर, ग्रामपंचायत सदस्य अनंता तळेकर बाळासाहेब तळेकर ,माजी जिल्हा परिषद सदस्य जेष्ठ नेते दिलीपदादा तळेकर यांनी खासदार नाईक निंबाळकर यांचे अभिनंदन केले आहे.
केम-ऊपळवाटे-दहिवली-टेंभुर्णी या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यात केम ते ऊपळवाटे या रस्त्यावर पावसाळ्यात चिखलाच्या साम्राज्यातून वाट शोधावी लागत होती. तसेच सायकल येणारे विद्यार्थांना तारेवरची कसरत करावी लागत होती. त्यामुळे प्रवासी विद्यार्थी जेष्ट नागरिक याना त्रास सहन करावा लागत होता. वांरवार या रस्त्याची दुरुस्ती करावी असी मागणी नागरिक करत होते परंतु या कडे दुर्लक्ष केले जात होते एसटि चालकाला तर मुक्काम गाडि या रस्यावर चालवताना तारेवरची कसरत करावी लागत होती.
या रस्तावर चिखलाचे साम्राज्य व रस्त्या चा कडेला वेडया बाभळीचे साम्राज्य या मधुन एसटि चालवताना जिकरीचे प्रयत्न करावे लागत होते. हा रस्ता खराब असल्याने कुंकवासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या गाडया या मार्गे न येता लांबून दुसऱ्या मार्गाने आणाव्या लागतात. त्यामुळे ट्रक ड्रायव्हर जास्त भाडे मागतात.त्यामुळे कुंकू कारखान्यावर परिणाम होत आहे.