धुंदीच्या सरी
वारा उनाड हा सोबतीला बेभान होऊनी वाहू लागला,
दाटून आले नभही सोबतीला, सूर्यही नभाशी लपंडाव खेळू लागला,
मृगजळाच्या मागे कस्तुरी हरणं ही सैरावैरा धावू लागली,
पावसाच्या त्या बेधुंद सरी आता मायभूमी झेलू लागल्या, शिवारं ही आता फुलू लागली,सोबती पिकही आता डौलू लागली,
डोंगर दऱ्यांच्या खुशीतून खळखळणारा झरा वाहुनी, तरंगिणीला आलींगण देऊनी सागराशी एकरुप झाला,
निसर्गही आता हिरवा शालू पांघरु लागला, मनामधे आठवणींच्या त्या सरी आता कोसळू लागल्या,
धुंदीच्या त्या सरी आता बेधुंद होऊनी बरसु लागल्या,