महिलेस पळवून नेल्याप्रकरणात उच्च न्यायालयात जामीन मंजूर
करमाळा/संदेश प्रतिनिधी
करमाळा,ता.11: महिलेस पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणात उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
यात हकीकत अशी की पांगरे येथील एका विवाहित महिलेने संशयित आरोपी नाथा मच्छिंद्र उघाडे याचे विरुद्ध 2 मे 2022 रोजी तिला पळवून नेऊन विनयभंग केल्याबाबतची फिर्याद दाखल केली होती व तदनंतर तिचा करमाळा येथील न्यायालयात लेखी जबाब नोंदवण्यात आला होता व तपासा दरम्यान सदर केस मध्ये महिलेवर अत्याचार केल्याबाबत भा.द.वि. कलम 376 प्रमाणे कलम वाढ करण्यात आली होती.
तदनंतर यातील आरोपी नाथा मच्छिंद्र उघाडे याने अतिरिक्त सत्र न्यायालय बार्शी येथे अटकपूर्व जामीन मिळणे कामे धाव घेतली होती. परंतु त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता .तदनंतर त्याने मुंबई येथील उच्च न्यायालयात अॅड. रितेश थोबडे व अॅड. निखिल पाटील यांचेमार्फत अटकपूर्व जामीन मिळणे कामी धाव घेतली होती.सदर जामिन अर्जाची सुनावणी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती माननीय अनुजा प्रभू देसाई यांचे कोर्टासमोर झाली.
सदर अर्जाचे सुनावणी वेळी आरोपीचे वकील श्री थोबडे व अॅड. सागर तांबे यांनी सदरच्या घटनेबाबत संशय व्यक्त करून, सुरुवातीला एफ आय आर दाखल करताना बलात्कार झाले बाबत कोणतेही कथन नसून तदनंतर केवळ आरोपीस त्रास देण्याच्या उद्देशाने तसा जबाब नोंदविण्यात आला व कलम वाढ करण्यात आले. तसेच उभयतामध्ये संमती असल्याचे घटनाक्रमावरून दिसून येते असा युक्तिवाद केला .सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी नाथा मच्छिंद्र उगाडे याची पंधरा हजार रुपयांच्या जातमचलक्यावर अटकपूर्व जामीनावर मुक्तता करण्यात आली.