गौंडरे शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश – विविध क्रीडा प्रकारात मिळविला महाराष्ट्रात प्रथम क्रमांक

करमाळा : युथ गेम्स असोसिएशन चॅम्पियनशिप महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत गौंडरे (ता. करमाळा) येथील धर्मवीर संभाजी विद्यालयातील १७ वर्षाखालील विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे.
सांघिक खेळ प्रकारात कबड्डी स्पर्धेत मुलींनी महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला व त्यांची नॅशनल स्पर्धेसाठी दिल्ली येथे निवड झाली आहे.त्याचप्रमाणे मुलांनीदेखील कबड्डी स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे.

वैयक्तिक खेळामध्ये 17 वर्षाखालील वयोगटातून खालील विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे –
1) आदित्य नारायण नलबे याने 400 मीटर धावण्यामध्ये महाराष्ट्रातून तृतीय क्रमांक
2) विठ्ठल बिरुदेव कोपनर याने 100 मीटर धावण्यामध्ये महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक
3) ओंकार ज्ञानदेव अंबारे याने भाला फेक मध्ये महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक
4) तुषार धनाजी हनपुडे याने 200 मीटर धावण्यामध्ये महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक
5) मोनिका नागनाथ सपकाळ हिने 100 मीटर धावण्यामध्ये महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक
6) ऋतुजा संतोष हनपुडे हिने 200 मीटर धावण्यामध्ये महाराष्ट्रातून प्रथम क्रमांक
7) रेणुका हरिचंद्र ननवरे हिने 200 मीटर धावण्यामध्ये महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक मिळविला आहे.

या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन शाळेचे शिक्षक मुळीक सर, गिलबिले सर, काळे सर, बापू तांबोळी यांचे लाभले. शाळेचे मुख्याध्यापक बापू निळ, शाळेचे ज्येष्ठ शिक्षक कोळेकर सर ,भोईटे सर ,हनपूडे सर ,जावळे सर, पुराणे सर आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
या यशानंतर गौंडरे परिसरातून व सोलापूर जिल्ह्यातील सर्व स्तरांतून खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक होत आहे.