टेंभुर्णी-केम एसटी बस कधी बंद तर कधी चालू – सुरळीत करण्याची मागणी
केम (प्रतिनिधी -संजय जाधव ) :
माढा तालुक्यातील टेंभुर्णी-केम एस टी बस सेवा कधी सुरु तर कधी बंद असते. यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. ही बस सेवा सुरळीत करावी अशी मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.
सकाळी सातची केम-टेंभुर्णी एसटी बस चालू असते, तर सकाळी दहा वाजताची टेंभुर्णी-केम बस बंद असते.
सायंकाळी पाच वाजताची टेंभुर्णी-केम बस बंद असते, तर सायंकाळी आठ वाजताची चालू. या अनियमित बस सेवेमुळे नागरिकांना कधी चालू कधी बंद कळत नसल्याने ही बस सेवा असून अडचण नसून खोळंबा झाली आहे.
एसटी बस च्या अनियमित गाड्यांबद्दल आम्ही कुर्डुवाडी एस टि आगारामध्ये संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. लवकरात लवकर एसटी च्या फेऱ्या सुरळीत नाही कराव्यात.
-हनुमंत चव्हाण, उपळवटे (ता. माढा)