यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शाखेचे उद्घाटन व मार्गदर्शन शिबीर संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शाखेचे उदघाट्न व कॉलेज मधील विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले. याप्रसंगी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनीलदादा गव्हाणे हे उपस्थित होते.

या महाविद्यालयात त्यांनी उपस्थित विध्यार्थ्यांशी वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधला तसेच सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीचे पत्र देवून अभिनंदन केले. यावेळी राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे मुख्य सरचिटणीस आकाश झांबरे, करमाळा तालुकाध्यक्ष संतोष वारे, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष अभिषेक आवाड, नगरसेवक अतुल फंड, युवा नेते अमीर तांबोळी, युवा नेते कुमार माने

राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष सचिन नलवडे, राष्ट्रवादी तालुका सरचिटणीस लाला शिंगटे, राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋषिकेश शिगची, उपाध्यक्ष आरशान पठाण, सुहास पोळ, दत्तात्रय भांडवलकर, यश कांबळे, यशवंतराव चव्हाण कॉलेजच्या शाखेचे अध्यक्ष अनिकेत ढावरे, शाखा उपाध्यक्ष शुभम वारे, उपाध्यक्ष शिवराज आमटे, सचिव दत्तात्रय धगाटे, सहसचिव विठ्ठल हाके, कार्याध्यक्ष सालिम सय्यद, कार्याध्यक्ष संघर्ष उबाळे, सरचिटणीस आशिष ठोसर, साहसरचिटणीस रामेश्वर भरते व अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

यशवंतराव चव्हाण महाविध्यलय येथे आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या शाखेचे उदघाटन केले असून देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी वेगवेगळ्या विध्यार्थ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेणार आहे तसेच विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा – ऋषिकेश शिगची ( शहराध्यक्ष – राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस, करमाळा )

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!