‘उमरड’ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी लालासाहेब पडवळे यांची बिनविरोध निवड

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : उमरड (ता.करमाळा) येथील सरपंच पदाच्या रिक्त जागेसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये सरपंच पदासाठी लालासाहेब नामदेव पडवळे यांचा एकच अर्ज आल्याने त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती एस आय काझी यांनी निवड जाहीर केली.

याप्रसंगी त्यांच्या अर्जावर सूचक म्हणून समाधान हरिश्चंद्र वलटे यांनी सही केली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून साई अडगटाळे तलाठी उमरड त्यांनी काम पाहिले. पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रमोद गवळी यांनी चोख बंदोबस्त ठेवला. यावेळी गावातील ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बदे, दत्तात्रय बदे, बापूराव चोरमले, मुकेश बदे, संदीप बदे, समाधान वलटे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!