सुराणा विद्यालयात विविध बक्षीस वाटप करून कर्मवीर पाटील यांची केली जयंती साजरी
करमाळा ( संदेश प्रतिनिधी) : चिखलठाण येथील श्रीम. रामबाई बाबुलाल सुराणा विद्यालय येथे २२ सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त प्रतिमापूजन व प्रतिमा मिरवणूक कार्यक्रम शाळेत पार पाडला. त्याचा उत्तरार्ध काल (दि.२४ सप्टेंबर) रोजी सभेच्या कार्यक्रमाने संपन्न झाला. तसेच या कार्यक्रमात विविध बक्षीस वाटप करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी विद्यालयातील स्थानिक स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य संदिपान तात्याबा बारकुंड हे अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते गणेशभाऊ करे-पाटील हे होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती राजेंद्र बारकुंड स्थानिक स्कूल कमिटी तथा मा. जि.प.उपाध्यक्ष, धुळाभाऊ कोकरे, श्रीपाल गव्हाणे, चंद्रकांत सुरवसे,जैनुद्दीन सय्यद, अतुल मारकड, औदुंबर मोरे इ. मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी धुळाभाऊ कोकरे (अध्यक्ष,कोकरे आयलँड) यांनी विद्यार्थ्यांना हनुमान जन्मभूमी कुगाव निबंध स्पर्धेसाठी एकूण 23000 रकमेची बक्षिसे विद्यार्थ्यांना दिली. तसेच श्री गणेश भाऊ करे पाटील संस्थापक अध्यक्ष यशकल्याणी ग्रामीण सेवाभावी संस्था यांनी इयत्ता दहावीतील प्रथम तीन विद्यार्थ्यांना दरवर्षी एकूण रक्कम 6000 देणार असल्याचे घोषित केले. तसेच या वर्षी विद्यार्थ्यांना ती रक्कम रोख स्वरूपात बक्षीस वाटप केली. श्री बल्लाळ सर यांनी निबंध स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून वही पेन पेन्सिल शार्पनर वाटप केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री गुरुराज माने यांनी केले यानंतर विविध स्पर्धा परीक्षेतून यशस्वी झालेले विद्यार्थी यामध्ये एन.एम.एम.एस,सारथी,गांधी संस्कार परीक्षा व शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षांमध्ये शिष्यवृत्ती धारक गुणवंत विद्यार्थ्यंचे उपस्थितांच्या हस्ते पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले ग्रामस्थांमधून श्री.गव्हाणे श्रीपाल यांनी तसेच स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व मा.जि.प. उपाध्यक्ष राजेंद्रकुमार बारकुंड यांनी आपल्या भाषणामध्ये विद्यालयाच्या उत्तरोत्तर होत असलेल्या प्रगतीची प्रशंसा केली. प्रमुख वक्ते गणेश भाऊ करे पाटील यांनी आपल्या भाषणातून कर्मवीरांनी सत्य आणि तळागाळातील समाजाला शिक्षित करण्यासाठी केलेले प्रयत्न अजरामर राहतील असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांमधून श्री आत्माराम नेमाने, श्री बाळासाहेब कळसाईत, श्री प्रमोद गव्हाणे, श्री आकाश कांबळे, श्री भिमराव पवार यांचे विशेष सहकार्य लाभले.
आभार प्रदर्शन विद्यालयाचे शिक्षक श्री.गोडगे.एल.व्ही यांनी केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व सेवकांनी परिश्रम घेतले