बहुजन संघर्ष सेनेच्या आंदोलनाला आले यश – शेतकऱ्यांच्या खात्यावर ऊस बिल जमा : राजाभाऊ कदम
करमाळा /संदेश प्रतिनिधी :
करमाळा : बहुजन संघर्षनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहसील कार्यालयावरती ऊस बिले मिळावीत म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शने केली व मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना निवेदन दिले व साखर आयुक्त पुणे यांनाही पत्र दिले त्याचा परिणाम म्हणून कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना घागरगाव या कारखान्याने मार्च एप्रिल मे मधील सर्व ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली. यामुळे शेतकरी वर्गाने बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांचे आभार व्यक्त केले.
गेल्या हंगामात मार्च, एप्रिल व मे महिन्यामध्ये गाळपास गेलेल्या उसाची बिले मिळावीत म्हणून बहुजन संघर्ष सेनेने करमाळा तहसील कार्यालयाच्या समोर मोठ्या प्रमाणात निदर्शने केली होती. कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील सहकारी साखर कारखाना घागरगाव ता.इंदापूर यांनी करमाळा तालुक्यातून मोठ्या प्रमाणामध्ये ऊस गाळपासाठी नेला होता पण मार्च, एप्रिल, मे महिन्यात गेलेल्या उसाची बिले शेतकऱ्यांना मिळाली नव्हती. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांनी बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्याकडे उसाची बिले मिळावेत म्हणून आंदोलन करण्याची मागणी केली होती त्याप्रमाणे बहुजन संघर्ष सेनेच्या कार्यकर्त्यांनी व शेतकऱ्यांनी आंदोलन करून हे यश मिळवले आहे.