चव्हाण महाविद्यालयात 'महात्मा गांधी आणि युवा पिढी’ या विषयावर डॉ.ॲड. बाबूराव हिरडे व्याख्यान संपन्न - Saptahik Sandesh

चव्हाण महाविद्यालयात ‘महात्मा गांधी आणि युवा पिढी’ या विषयावर डॉ.ॲड. बाबूराव हिरडे व्याख्यान संपन्न

करमाळा / संदेश प्रतिनिधी :  

करमाळा : करमाळा शहरातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी जयंतीनिमित्त ‘महात्मा गांधी आणि युवा पिढी’ या विषयावर संत साहित्याचे अभ्यासक डॉ.ॲड.बाबूराव हिरडे यांनी मार्गदर्शन पर व्याख्यान संपन्न झाले. याप्रसंगी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एल.बी.पाटील होते.

या कार्यक्रमासाठी विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, यावेळी विद्या विकास मंडळाचे सहसचिव विक्रम सूर्यवंशी, उपप्राचार्य डॉ.अनिल साळुंखे, कॅप्टन प्रा. संभाजी किर्दाक उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ.हिरडे यांनी म्हटले की, नवभारताच्या निर्मितीसाठी महात्मा गांधी यांच्या विचारांना पर्याय नसून, त्यांच्या विचारांचे अनुकरण आजच्या युवा पिढीने करणे ही काळाची गरज आहे, असेही डॉ.हिरडे यांनी सांगितले.

महात्मा गांधी यांचे विचारच देशाला तारून नेवू शकतात, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य मिलींद फंड यांनी केले. प्राचार्य डॉ. पाटील यांनी महात्मा गांधी यांच्या अहिंसा, सत्य, अपरिग्रह आणि मौन यामध्ये असलेल्या सामर्थ्याचे सोदाहरण स्पष्टीकरण केले. प्रास्ताविक प्रा. विष्णू शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.सुजाता भोरे यांनी केले तर आभार प्रा.अभिमन्यू माने यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!