श्री कमलाभवानी मंदिरात माही डेकोरेट्सतर्फे दरवर्षी फुलांची सजावट – नऊ दिवस विविध फुलांच्या सजावटीने मंदिर परिसर बहरला…
करमाळा / संदेश प्रतिनिधी :
करमाळा : करमाळा तालुक्याचे आराध्य दैवत श्री कमलाभवानी मंदिरात नवरात्र महोत्सव २६ सप्टेंबर पासुन मोठ्या उत्साही वातावरणात सुरू आहे. याच नवरात्र महोत्सवचे औचित्य साधुन करमाळा शहरातील ‘माही डेकोरेट्स’ यांच्यातर्फे दरवर्षी मंदीरात फुलांची सजावट करण्यात येत असते. नवरात्र महोत्सवात दरवर्षी मंदिरात माही डेकोरेट्स यांच्या आजोबाच्या स्मरणार्थ व सेवेकरी बाळासाहेब बाबा गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली सजावट केली जाते.
श्री कमलाभवानी मंदिर परिसर विविध फुलांच्या आकार व सजावटीमुळे अगदी बहरून गेलेला दिसून येतो. मुख्य मंदिरात, गाभाऱ्यात तसेच मंदिराच्या सभोवतालच्या परिसरात तसेच मुख्य मंदिराचे प्रवेशद्वार विविध फुलांची सजावट केली जाते. यामुळे येणाऱ्या भाविकांचे मन प्रसन्न होते.
श्री कमलाभवानी मंदिरात काम करताना तयारी कशी असावी देवीच्या शालु चा कलर जो असेल त्याच कलरची ओरिजनल फुलांचा वापर करण्यात येतो, वेचक फुलांच्या ताजेपणा पासुन कामातील नाविन्य , कारागिर नियोजन, लागणारा वेळ, वेळेत काम पूर्ण करण्याची हमी अशा एक ना अनेक जोखमांचा सामना करत, अडथळ्यांना पार करत हे काम पूर्णत्व ला आणावे लागते असे माही डेकोरेशनचे श्री.गोडसे यांनी म्हटले आहे.
दरवर्षी प्रमाणे स्वखर्चाने गोडसे परिवार माही डेकोरेट्स सेवा करतात काम पुर्णत्वाला नेण्यासाठी संपुर्ण गोडसे परिवार व शहरातील रंभापुरातील महिला भगिनींचे सहकार्य लाभले व उमेश गोडसे महेश गोडसे मंगेश गोडसे अशोक गोळे, अनुराग करंडे, ओंकार राऊत, रोहित पवार, सागर जाधव, आकाश गरड, समाधान गोळे, दिनेश गोळे, सोनु जाधव, सागर गोळे, धिरज गोळे याचे मोलाचे सहकार्य लाभले.