गौंडरे फाट्याजवळ जुगार खेळणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले - Saptahik Sandesh

गौंडरे फाट्याजवळ जुगार खेळणाऱ्या ५ जणांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : गौंडरे फाटा (ता.करमाळा) येथील दिनकर अंबारे यांचे शेतातील पत्राचे शेडजवळ ५ जण पत्यांचा डाव खेळत असल्याची खात्रीशीर माहिती करमाळा पोलिसांना मिळाल्याने, त्यांनी तातडीने त्याठिकाणी जावून या ५ जणांना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत, त्यांच्या जवळील ११,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी करमाळा पोलिसात पोलीस सोमनाथ महादेव जगताप यांनी फिर्याद दिली असून त्यात त्यांनी म्हटले कि, ३ सप्टेंबरला पोलिसनिरिक्षक यांचे मार्गदर्शनाखाली मी, पोलीस कॉन्सटेबल उबाळे, पोलीसनाईक ढवळे, पोलीस कॉन्सटेबल जगताप, पोलीस कॉन्सटेबल काझी असे खाजगी वाहनाने करमाळा पोलीस ठाणे हददीत पेट्रोलिंग करीत असताना माहितीदाराकडुन माहिती मिळाली की, मौजे गौंडरे फाटा (ता.करमाळा) दिनकर अंबारे यांचे शेतातील पत्राचे शेडजवळ ५ जण पत्यांचा डाव खेळत आहेत.

त्यामुळे आम्ही तातडीने दोन इसमांना पंच म्हणुन घेवून गेलो त्यांना घेराव घालुन जागीच पकडले. पकडलेल्या इसमांना आम्ही दोन पंचासमक्ष त्यांचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) खंडु महादेव दयाळ वय 25 वर्ष रा मुरूड ता लातुर जि लातुर 2) सागर जनार्धन कारंडे वय 35 वर्ष रा केम ता करमाळा 3) दिनकर सुखदेव अंबारे वय 45 वर्ष रा गौंडरे ता करमाळा 4) रमजान जवुर शेख वय 42 रा परांडा ता परांडा जि उस्मानाबाद 5) नितीन गोरख तळेकर रा केम ता करमाळा अशी त्यांनी नावे सांगितले. त्यांच्याकडील ११,६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वरील ५ जणांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!