करमाळा शहरातील तरुण बेपत्ता

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : करमाळा शहरातील साठेनगर भागातील तरुण बेपत्ता झाला असून परिवारातील प्रतिनिधींनी पोलीसात हरवल्याची तक्रार आज (ता. ४) रोजी नोंदवली आहे. अमोल बारीकराव आलाट (वय – ३३, रा. साठेनगर, करमाळा) असे या तरूणाचे नाव असून तो काहीही न सांगता घरातून बाहेर निघून गेला आहे.

त्याचा अनेक ठिकाणी शोध घेऊनही तो न सापडल्याने पोलीसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!