दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्याला पोलीसांनी पकडले - Saptahik Sandesh

दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्याला पोलीसांनी पकडले

करमाळा / संदेश प्रतिनिधी :

करमाळा : केडगाव (ता. करमाळा) येथे दारू पिऊन आरडाओरडा करून गोंधळ घालताना ४२ वर्षाच्या प्रौढास करमाळा पोलीसांनी पकडले आहे. या प्रकरणी त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यात पोलीस कॉन्स्टेबल शेखर बागल यांनी फिर्याद दिली असून, त्यांनी म्हटले आहे, की आम्ही चिखलठाण, जेऊर दूरक्षेत्र हद्दीत पेट्रोलिंग करत असताना एका माहितीदाराकडून केडगाव (ता. करमाळा) येथील सचिन किसन बोराडे हा दारू पिऊन मोठमोठ्याने ओरडून गोंधळ करत असल्याचे समजले. आम्ही त्यास पकडून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!